प्रसाद नगरच्या जागेचा प्रश्न सोडणण्या साठ केंद्रीय मंत्री ना आठवले यांची भेट
प्रसादनगरचा जागेचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट अहिल्यानगर, दि. २ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) : देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर येथील गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता केंद्र सरकारच्या दारात पोहोचला आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे २५० कुटुंबे रहीवास वास्तव्यास असून, या कुटुंबांना पक्की घरे व हक्काची जागा मिळावी, यासाठी नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेत विनंती केली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले अहिल्यानगर दौऱ्यावर आले असता अहिल्यानगर येथील भेटीत प्रसादनगर येथील नागरिकांसाठी केंद्र सरकारची PMAY-U 2.0 योजना मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली. आप्पासाहेब ढूस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर येथील गट ...