माझी वसुधरात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर
माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल ! तीन ग्रामपंचायतींना दीड कोटींचे पुरस्कार जाहीर प्रतिनिधी ॥ ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत. या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरा...