Posts

Showing posts with the label दुनिया झुकाने वाला चाहिए

भोगू अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ ओळख पटेल अशा फिरवल्यावर कारवाई

Image
 भोगू अशोक खरात च्या व्हिडिओ क्लिप्स ओळख पटेल अशा तर कारवाई  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  उशिरा का होईना, पण कठोर कारवाईची गरज आहे  भोगू अशोक खरात प्रकरणात प्रशासनाने जर सुरुवातीपासूनच तत्परता दाखवली असती, तर महिलांवरील अत्याचार काही प्रमाणात तरी रोखता आले असते, अशी तीव्र भावना समाजातून व्यक्त होत आहे. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रकरणाचा तपास योग्य, निष्पक्ष आणि प्रामाणिक पद्धतीने करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देणे हीच काळाची गरज आहे. या प्रकरणात अशोक खरात याचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्या क्लिप्समधून काही महिलांची ओळख पटल्याचा ठपका ठेवत तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील दोन जण आणि बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या असताना, केवळ काही व्यक्तींवर कारवाई करणे पुरेसे ठरणार नाही. जर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करायचा ठरवले, तर संपूर्ण राज्यावरच गुन्हे दाखल करावे लागत...