नाशिक पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे पिच्छे मूड
नाशिक चे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पिच्छे मुड राज्यातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या बदलीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता कराळे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ही बदली करण्यात आल्याने राजकीय तसेच पोलीस वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित प्रशासकीय बदल्यांचा भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात असले, तरी काही अलीकडील घडामोडींमुळे या बदल्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यापूर्वी अशोक खरात प्रकरणात दत्ता कराळे यांचे कथित संबंध असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर कराळे यांच्या बदलीकडे संशय...