Posts

Showing posts with the label पूरस्थिती

जिल्हात बेमोसमीचे तांडव खडकी व वाळकीचे 25 नागरीक सुरक्षीत जागेवर हलविले

Image
खडकी वाळकी परिसरात पूरपरिस्थिती 25 नागरीक हलवले  लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरु  बेमोसमी मुसळधार पावसाने  अविरत पडणाऱ्या  जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी  व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून, रहिवासी अडकून पडले आहेत. हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. याठिकाणी लष्कराच्यावतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून १० व वाळकी येथून १५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ACC&S येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले. हमदत पथक सायंकाळी पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले आहे, अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.