शाश्वत शेती साठी ड्रोन तंत्रज्ञान-कुलगुरु पी जी पाटील
भविष्यातील शाश्वत शेतीसाठी रोबोटीक्स, आयओटी, डिजीटल ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात पदार्पण करतांना विकसीत भारत 2047 ला लोकसंखेचा विचार करता अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये डिजीटल व माहिती तंत्रज्ञानाचा सर्वांगीन वापर करणे आवश्यक आहे. 2047 मध्ये जगाची लोकसंख्या 970 कोटी अपेक्षीत असतांना भारताच्या वाढत्या लोकसंखेस अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी कृषि क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेणे आवश्यक आहे. माती, पाणी, हवा, इंधन यांची गुणवत्ता एका बाजुने घसरत असतांना वेगाने बदलत चाललेले हवामान हे कृषि क्षेत्रातील आव्हानाची दुसरी बाजु आहे. त्यासोबत शेती क्षेत्रापासून दुर चाललेले तरुण, शेतीत कमी होत चाललेले मनुष्यबळ यांचा विचार करता शेतीमध्ये स्वयंचलीत यंत्र आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्य...