अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संगीता मालकर यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने स्नेह सत्कार करण्यात आला. शहर बँकेचे उपाध्यक्ष तथा श्री विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते स्नेह गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस , पत्रकार शिवाजी घाडगे, कारभारी गरड, चंद्रकांत सोनार उपस्थित होते. संगीता मालकर यांना श्री विशाल गणेशाची प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. माणिक विधाते म्हणाले की संगीता मालकर या महिला सक्षमीकरणासाठी निस्वार्थ भावनेने सातत्याने कार्य करत आहेत. त्या केवळ शिक्षिका नसून समाजातील वंचित, गरजू आणि एकल महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ हा केवळ स...