Posts

Showing posts with the label 300 हुन अधिक बदल्या होणार

जिल्ह्यातील पोलीस दादा बदल्याना मुर्हुत

Image
अहिल्यानगर पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांना अखेर मुहूर्त  घाडगे न्यूज @प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतीक्षित प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुरुवारी  पोलीस मुख्यालयात विनंती बदली बैठक   प्रक्रियेत राबविण्यात आली  जिल्ह्यातील सुमारे 300 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.    जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अंमलदारांकडून यापूर्वीच बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या तीन ठिकाणांचा उल्लेख करून अर्ज सादर केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, 30 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया खोळबली  होती. पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन यांनी प्रलंबित प्रक्रिया पुन्हा गतीमान केली असून बदलीपात्र अंमलदारांना गुरुवारी सकाळ पासून ...