तटकरे सिल्व्हर ओक वर भेटीला
तटकरे यांच्या ‘सिल्व्हर ओक’ वर भेटीला सिल्व्हर भेटी।शिवाजी घाडगे महाराष्ट्राच्या राजकारणात काही भेटी या केवळ शिष्टाचारापुरत्या नसतात; त्या अनेक राजकीय संकेत देऊन जातात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे घेतलेली भेट ही अशाच प्रकारची मानली जात आहे. वरकरणी साधी वाटणारी ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. अजित पवार यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली. त्यानंतर सत्तेतील समीकरणे बदलली, निष्ठा बदलल्या आणि अनेक नेत्यांचे राजकीय वजन नव्याने मोजले जाऊ लागले. या प्रक्रियेत सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनाही सतत राजकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षांतर्गत कोडमारी, सोशल मीडियावरील टीका, विविध वादांमध्ये नाव ओढले जाणे आणि कार्यकारिणीतील बदलांच्या चर्चा यामुळे तटकरे यांच्याभोवती अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी...