Posts

Showing posts with the label एमी पी के व्ही मध्ये आयोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास परिषदे साठी येणार राहुरीला

Image
मुख्यमंत्री येणार महात्मा फुले कृषि विद्यापीठात 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दिनांक 25 ते 27 मे, 2023 या कालावधीत 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे असणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मंत्री, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री अहमदनगर ना. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री आणि कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत चारही कृषि विद्यापीठाच्या विविध पिकांच्या वाणांना, संशोधन तंत्रज्ञानाच्या शिफारशींना तसेच सुधारीत औजारांना चर्चेअंती मान्यता देण्यात येईल. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 5 वाण, फळ पिकाचे 1 वाण, 3 यंत्रे व 74 शिफारशी, दापोली कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 2 वाण, फळ पिकाचे 1 वाण व 38 शिफारशी, परभणी कृषि विद्या...