राहुरीत एकल महिला व बालकांच्या योजना प्रभावी राबविणार
राहुरीत एकल महिला व एकल बालकांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय; विविध योजनांच्या प्रभावी राबविणार घाडगे न्यूज।प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीची महत्त्वपूर्ण सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. यात तालुक्यातील एकल महिला आणि एकल बालकांच्या विविध समस्या, त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच त्यांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले तसेच 'साऊ' एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस उपस्थित होते. सभेत तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या महिलांची अचूक ...