भाजपा होतोय का आया राम गया राम पक्ष?
भाजप होत आहे ‘आया राम–गया राम’ पक्ष? चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे भाजपमध्ये ‘आया राम–गया राम’ संस्कृती वाढत असल्याचा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. याबाबत अलिकडेच माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आवाज उठवला. कोणतीही तमा न बाळगता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड विरोध दर्शवला. याआधी पक्षातील ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे तसेच “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,” तसेच विनोद तावडे यांनाही अशाच प्रकारची वागणूक मिळाल्याचे जनतेसमोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या, स्वतःला सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमध्ये असे बेशिस्त वातावरण निर्माण होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आधीच तापलेले नाशिक, आता भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे अधिकच तापले आहे. साधु नाशकात येण्या आधीच राजकीय सधी साधुनी संधी साधली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्य...