कृषी उत्पन्न वाढीस भारतीय स्त्री यांचे मोठे योगदान-डाॅक्टर सौम्या स्वामीनाथन
कृषी उत्पन्न वाढीस भारतीय महिलांचे मोठे योगदान : डॉ. सौम्या स्वामीनाथन राहुरी घाडगे न्यूज।प्रतिनिधी शेतीत महिलांची वाढती भूमिका; तंत्रज्ञानाची जोड आवश्यक #*ग्रामीण भागात ८० टक्क्यांहून अधिक महिला शेतीत कार्यरत असल्याची माहिती #*महिलांच्या श्रम कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व इंटरनेट सुविधा आवश्यक #*स्मार्टफोनच्या मदतीने महिलांसाठी शेती अधिक सुलभ होणार #*महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ सुरू #*एकात्मिक शेती मॉडेलमुळे काही गावांचे उत्पन्न १.५ कोटींवरून ३.५ कोटींवर #*महिला शेतकऱ्यांचा ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पांतर्गत सत्कार -ग्रामीण भागातून शहरांकडे वाढत्या स्थलांतरामुळे शेतीत मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या शेतीतील श्रम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. महिलांना साक्षरतेबरोबरच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या स्मार्टफोनच्या मदतीने अधिक सक्षमपणे शेती करू शकतील. घरामध्ये अन्न तयार करण्याबरोबरच शेतात धान्य उत्पादनामध्येही महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन...