Posts

Showing posts with the label 2023

एम पी के व्हीत तिफन संमेलन

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफन- 2023 चे आयोजन  दिवसेंदिवस भारतीय शेतीमधील प्रश्न व आव्हाने वाढत आहेत. त्यापैकी एक  भागातील तरुण  नोकरी धंद्यासाठी शहरात स्थलांतरित होत आहे. यामुळे शेतीमधील कुशल मनुष्यबळ कमी होत आहे.  सन 1971 मध्ये शेतीमधील मनुष्यबळ 67% होते ते 2021 मध्ये 50% पर्यंत आले आहे, सन 2025 मध्ये ते 39%  पर्यंत खाली येणार असल्याचे भाकित आहे. यामुळे शेतीतील मजुरांची कमतरता दिवसेंदिवस जाणवत चालली आहे.  यावर पर्याय शोधण्यासाठी आपल्याला कमी खर्चातील  यंत्रे, शाश्वत व किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करावी लागतील, जेणेकरून मशागती पासून, पीक काढणी व मूल्यवर्धनापर्यंत प्रक्रिया करणे सोपे होईल. यामुळे शेतकऱ्याला त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळेल आणि शेती फायद्याची होईल, याकरिता भविष्यामध्ये शेती टिकवायची असेल तर शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी केले.      ...