ऊसाला चाबुक काणी रोगाने घेरल
उसामध्ये चाबूक काणी रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ देशातील एकमेव कृषि विद्यापीठ - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे की ज्यांनी उसावरील चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून सन 2016 मध्ये को एम 7601, एम एस 7604 या दोन आणि सन 2023 मध्ये को एम 11086 व को एम 13083 अशा एकूण चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील यांनी दिली. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे राहुरी कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असून भारतातील ऊस संशोधनामध्ये काम करणार्या संस्थेपैकी एक अग्रेसर केंद्र आहे. या केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे 16 पेक्षा जास्त वाण, 105 पेक्षा जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत शिफारशी व तंत्रज्ञान दिले...