Posts

Showing posts with the label पोलीस चौकी करा

पानेगावात चोरट्यांचा धुमाकुळ

Image
पानेगावात चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास! नेवासा।  प्रतिनिधी नेवासा तालुक्याच्या पश्चिम भागातील मुळाथडी परिसरातील पानेगाव येथे  मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत अनेक घरांना लक्ष्य केले. या चोरीच्या घटनांमध्ये रोख रकमेसह शेळी व इतर ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांसह वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुळाथडी परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी उभारावी, या मागणीसाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  मध्यरात्री चोरट्यांनी शिरगाव रस्त्यापासून चोरीच्या घटनांना सुरुवात केली. दगडफेक करीत चोरट्यांनी मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले यांच्या वस्तीवरील बंगल्याचे गेट तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील रोख रक्कम तसेच कपड्यांची उचकापाचक करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. त्यानंतर मनोहर भागवत, बाबासाहेब संपत जंगले आणि काबू जंगले यांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या घरांमधून रोख रकमेसह एक शेळी चोरून नेण्यात आली. शुक्...