Posts

Showing posts with the label अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न

निळवंडे ऊर्ध्व प्रवरा कालव्यातून पाणी सोडुन ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते चाचणी

Image
ऊर्ध्व प्रवरा निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी‌‌ यशस्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चाचणी ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या  उजव्या कालव्यातून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी पाणी सोडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली.    यावेळी‌ खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदीप हापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला.पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे.डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आ...