Posts

Showing posts with the label कोण बनेगा नगराध्यक्ष

देवळाली प्रवरात कोणाचा झेंडा

Image
देवळाली प्रवरात नगरपालिकेवर कोणाचा झेंडा? घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडियावरील प्रचार, बॅनर्स, चौकसभा यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक नियोजित वेळेत झाली असती तर चित्र वेगळे असले असते; मात्र मुदतवाढीनंतर ही लढत अधिकच उत्कंठावर्धक बनली आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता तिरंगी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना रंगणार आहे. भाजपाकडून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, काँग्रेसकडून शहराध्यक्ष व तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, तर शिवसेना (शिंदे) गटाकडून उद्योजक बाबासाहेब मुसमाडे हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय बहुजन वंचित समाज पक्षाचे ॲड. प्रसाद सांगळे यांनीही स्वतंत्र ताकद उभी केली आहे. या निवडणुकीत कमळ, पंजा, धनुष्यबाण आणि गॅस टाकी या चिन्हांमध्ये लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादी का...