Posts

Showing posts with the label एम पी केव्हीत व्याख्यान

स्वतःचे ज्ञान सतत अपडेट ठेवा

Image
माहिती व तंत्रज्ञान युगात   अपडेट रहा  -  व्याख्याते जयेश देशमुख तुम्हाला जे काही बनायचे आहे ते प्रथम कागदावर लिहा व ते पुर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहा. आपल्यातील सॉफ्ट स्किल विकसीत करण्यासाठी नेहमी स्वतःला अपग्रेड करुन अपडेट ठेवा असे प्रतिपादन यशदा संस्थेने मान्यता दिलेले प्रेरक वक्ते व प्रशिक्षक जयेश देशमुख यांनी केले.  विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने महिन्यातून दोन वेळा तज्ञ व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बॅक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (कास्ट-कासम प्रकल्प) यांच्या सहकार्याने सॉफ्ट कौशल्य विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी तज्ञ व्याख्याते म्हणुन  जयेश देशमुख बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक...