शेती महामंडळाच्या करार शेतीला पाणी देण्यासाठी 40 हजारांची लाच घेणारे तिघे पकडले
पाण्याचा पैसा शेती महामंडळाच्या करारी शेतीस पाणी देण्यासाठी 40 हजाराची लाच स्विकारताना पाटबंधारेचे तीन कर्मचारी पकडले नगरच्या लाच लुचपत विभागाची कारवाई यशस्वी सापळा तक्रारदार- पुरुष वय- ५८ वर्ष, रा.महांकाळ वडगांव, तालुका श्रीरामपूर, जि.अहमदनगर आरोपी १) आलोसे अंकुश सुभाष कडलग, वय-४२ वर्ष धंदा- नोकरी, कालवा निरीक्षक, वर्ग-३, वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर, जि. अहमदनगर रा.बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर २) अनिस सुलेमान शेख, वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम) रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर ३) संजय भगवान करडे, वय-३८ वर्ष, धंदा-फुल व्यवसाय, (खाजगी इसम) रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर लाचेची मागणी- ८५,०००/- ₹ तडजोड अंती ४०,०००/- ₹ लाच स्वीकारली -४०,०००/-₹ ०७/०६/२०२३ लाचेचे कारण -.तक्रारदार यांचे सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण...