Posts

Showing posts from July, 2026

लोकमान्य टिळक पुण्यतिथी माझ्या भाषणाची पहिली सुरुवात

Image
लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनी माझ्या पहिल्या भाषणाचा जन्म   -शिवाजी घाडगे  लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने माझ्या वक्तृत्वाची, लेखणीचा आणि जीवन प्रवासाची सुरवात झाली  दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस देशभरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या आदराने साजरा केला जातो. अनेकांसाठी हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका महानायकाला अभिवादन करण्याचा असतो; पण माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व त्यापेक्षाही अधिक आहे. कारण हा दिवस माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारा दिवस आहे. आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वी, शालेय जीवनात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केलेले माझे पहिले भाषण हेच माझ्या वक्तृत्वाचा जन्म ठरले. त्या दिवशी मिळालेल्या टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आणि त्या टाळ्यांनीच माझ्यातील वक्ता, लेखक आणि पत्रकार घडविण्याची प्रक्रिया सुरू केली त्या वेळी मी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला व्यासपीठावर उभे राहण्याची भीती वाटली नाही स्वतःवर विश्वास...

शोध पत्रकारीता लोप पावता कामा नयेत प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील

Image
शोध पत्रकारिता लोप पावता कामा नये ; माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे – जयंत पाटील घाडगे न्यूजसाठी -श्रीरामपुरहुन @अनिल पाडे देशातील राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक बदलांचा सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या क्षेत्रावर पडला असेल, तर तो पत्रकारितेवर पडला आहे. पूर्वी समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी शोध पत्रकारिता आज दुर्मिळ होत चालली आहे. त्याऐवजी अनेक माध्यमांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप आणि तात्कालिक चर्चांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेने सत्य, वस्तुनिष्ठता आणि जनहित यांचा ध्यास सोडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीरामपूर येथे आयोजित ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकमतचे राजकीय संपादक यद...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
कापूस उत्पादक शेतकर्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन राहुरी। महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांतर्गत  कोंढवड येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या कापूस उत्पादक शेतकर्यांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार आणि दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सहायक कृषि अधिकारी भारती ढगे, दुर्गा शहाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. खर्डे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे उद्दिष्टे विषद केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मंचामार्फत शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कापूस उत्पाद...

जिल्हा सहकारी बॅकसाठी विधानपरिषद संभापती प्रा राम शिंदे व माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील याच्या निर्णयाने रंगत

Image
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली; प्रा राम शिंदे व माजी खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय समीकरणे आकार घेत असून, बँकेच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व राहणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, माजी मंत्री तसेच बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के हे यावेळी निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना संधी मिळू शकते, असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्येच नेतृत्व आणि वर्चस्वाची चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणांवर भाजपच्या वरिष्ठ ने...

श्रीरामपूरातील पोलिस उपनिरीक्षक वर लाचखोरीचा गुन्हा दाखल

Image
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचखोरीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील यवला येथे कार्यरत असतानाच्या प्रकरणाशी संबंधित असून, त्यांच्यासह दोन खासगी हस्तकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात अटक न करणे व सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांनी ₹४ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती ही रक्कम ₹२ लाख ५० हजारांवर निश्चित करण्यात आली. यातील ₹५० हजारांची रक्कम ऑनलाइन फोनपे  द्वारे स्वीकारण्यात आल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. ही रक्कम सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) याने स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर, सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३८, दोघेही रा. पाटोदा, ता. यवला, जि. नाश...

शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे पावित्र्य राखा

Image
 शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे पावित्र्य राखा  श्रध्दा।शिवाजी घाडगे  शिर्डी हे केवळ महाराष्ट्रातील एक गाव नाही, तर ते जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि अध्यात्माचे केंद्र आहे. "श्रद्धा" आणि "सबुरी" हा साईबाबांनी दिलेला संदेश आजही लाखो भाविकांच्या जीवनाला दिशा देतो. देश-विदेशातून येणारे भक्त साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतात. त्यांच्या मनात एकच भावना असते बाबांचे दर्शन घ्यायचे, त्यांच्या चरणी माथा टेकवायचा आणि मनातील दुःख, वेदना व आशा त्यांच्या चरणी अर्पण करायच्या. मात्र, गेल्या काही दिवसांत शिर्डीत घडलेल्या काही घटनांनी साईभक्तांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, समाधीचे पावित्र्य, विशेष व्यक्तींना मिळणारी वागणूक आणि संस्थानचा कारभार यावर चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नांकडे भावनेने नव्हे, तर जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. अलीकडे मंदिर परिसरात एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी लाखो भक्त स्वतःला सुरक्षित समजतात, त्या परिसरात अशी घटना घडणे ही...

पिसाळलेल्या कुत्र्या चा वृध्दाला चावा घेत ठार मारल अण्य 15 जणांना डसले

Image
पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्धाचा फाडले १५ जणांना चावा घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने झोपेत असलेल्या एका वृद्धावर अत्यंत क्रूर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. याच कुत्र्याने परिसरातील सुमारे १५ नागरिकांनाही चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत वृद्धाचे नाव साहेबराव राघुजी वाघमारे (वय ७०) असे आहे. ते आपल्या दुकानासमोर नेहमीप्रमाणे झोपलेले असताना मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. कुत्र्याने त्यांच्या शरीराचा अक्षरशः चावा घेत फाडल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ला इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन राहुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. १५ नागरिक जखमी; रेबीज प्रतिबंधक उपचार सुरू वृद्धावर हल्ला केल्यानंतर या पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरात ध...

श्रीराबुरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र

Image
श्रीरामपूरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  पायात रुतलेला काटा अर्धवट काढून चालत नाही. तो अर्धवट राहिला, तर प्रत्येक पावलागणिक वेदना देत राहतो. जोपर्यंत तो पूर्णपणे बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत आराम मिळत नाही. हाच न्याय समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींबाबत लागू होतो. गुन्हेगारांवर कारवाई अर्धवट राहिली, भ्रष्टाचाराला मूक संमती मिळाली किंवा कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने झाली, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही पोलीस दलाची खरी ताकद केवळ गुन्ह...

श्रीरापुरात नेमके अपयश कोणाचे

Image
 श्रीरामपूरत नेमके अपयश कोणाचे  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या कारणाने राज्याच्या चर्चेत आले आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, संताप आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेले प्रश्न पाहता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) निखिल गुप्ता यांना स्वतः श्रीरामपूरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा लागला. एखाद्या गंभीर घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देणे ही प्रशासनाची नियमित प्रक्रिया असली, तरी अशा भेटीची वेळ का आली, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. कायदा व सुव्यवस्था ही केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यापुरती मर्यादित नसते. गुन्हे होण्यापूर्वीच त्यांना आळा घालणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे, सराईत गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवणे, अवैध व्यवसायांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबद्दल विश्वास निर्माण करणे ही पोलिस यंत्रणेची मूलभूत जबाबदारी आहे. जेव्हा या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पडत नाहीत, तेव्हा परिस्थिती...

येने केने मार्गाने गुन्हेगार सुटता कामा नये कायद्याचा कठोर बडगा हवा

Image
"येन-केन प्रकारेण गुन्हेगार सुटता कामा नयेत कायद्याचा कठोर बडगा हवा!" स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येला अकरा दिवस पूर्ण झाले आहेत. अवघ्या तीस वर्षांच्या तरुणाची भरदिवसा हत्या होते आणि त्यानंतर संपूर्ण शहरात भीती, अस्वस्थता व संतापाचे वातावरण निर्माण होते. एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरती मर्यादित नाही, तर ती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे आणि कायदा-सुव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हानाचे प्रतीक बनली आहे. आज श्रीरामपूरातील व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारू लागले आहेत. दहशतीच्या सावटाखाली व्यवसाय करावा लागणे ही कोणत्याही प्रगत शहरासाठी लाजिरवाणी बाब आहे. एकेकाळी गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटायचा. पोलिसांचा दरारा होता. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांनाही कायद्याची भीती वाटत होती. मात्र आज परिस्थिती बदलत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. "येन-केन प्रकारेण गुन्हेगार सुटता कामा नयेत" असे ठामपणे सांगण्याची हिंम...

महात्मा फुले जन आरोग्य फाईल मजुरी साठी लाच संगमनेर मध्ये दोघांवर कारवाई

Image
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील बिल मंजुरीसाठी दोन हजाराची लाच संगमनेर मध्ये दोघांवर   कारवाई घाडगेन्यूज| प्रतिनिधी गरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखालीच लाभार्थ्यांकडून लाचेची मागणी होत असल्याचे गंभीर प्रकरण संगमनेर येथे उघडकीस आले आहे. रुग्णाच्या उपचाराचे बिल मंजूर करून देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. या घटनेमुळे जनआरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या तील आरोपीं सुभाष दगडू धाडवड (वय २९) आणि सुजित दामोदर गायकवाड (वय ३४) अशी असून दोघेही संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत संगमनेर पोलीस ठाण्यात दोघा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.  सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बदल्य...

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे श्रीरामपूर दाखल

Image
ब्रेकिंग@घाडगे न्यूज  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे श्रीरामपूरमध्ये दाखल श्रीरामपूर शहरातील अलीकडील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे आज श्रीरामपूर येथे दाखल झाले आहेत. सध्या पोलीस अधिकारी आणि संबंधित विभागांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपासाची प्रगती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू आहे. शहरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावर ही बैठक होत असल्याचे समजते. 

गुन्हेगारांवर सुदर्शन चक्र फिरलेच पाहीजे

Image
 गुन्हेगारांवर ‘सुदर्शन चक्र’ फिरलेच पाहिजे स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरती मर्यादित नसून, शहरातील वाढत्या गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायद्याच्या धाकाच्या अभावाकडे बोट दाखवणारी आहे. नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे  गुन्हेगारांच्या दहशतीतून मुक्त कधी होणार? हत्येचे नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाही. मात्र, केवळ जेवण देण्याच्या किरकोळ कारणावरून इतकी गंभीर घटना घडली असे मानणे कठीण वाटते, अशी चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणामागे वैयक्तिक वैर, गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्वाची लढाई किंवा इतर काही कारणे आहेत का, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. श्रीरामपूरमध्ये गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ, गांजा, मादक द्रव्ये आणि इतर अवैध व्यवसायांचे जाळे वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अशा अवैध धंद्यांमधून आर्थिक बळ मिळवणारे काही लोक समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वावर...

मी पगारावर खुश आहे म्हणारा निघाला लाचखोर

Image
मी पगारावर समाधानी बोर्ड लावणारा निघाला लाचखोर  दिखावा।शिवाजी घाडगे  "मी माझ्या वेतनात समाधानी आहे." सरकारी कार्यालयाबाहेर लावलेला हा फलक पाहिला की सामान्य नागरिकाच्या मनात त्या अधिकाऱ्याबद्दल आदर निर्माण होतो. शासनाकडून मिळणाऱ्या वेतनात समाधान मानून प्रामाणिकपणे सेवा करणारा अधिकारी अशी त्याची प्रतिमा तयार होते. पण हाच अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला, तर तो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर घाला घालणारा प्रसंग ठरतो. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप उत्तम मोरे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. एका बांधकाम कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या तीन टक्के रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला आणि मोरे यांना रंगेहात पकडले. कायद्याचे काम कायदा करेल; न्यायालय अंतिम निर्णय देईल. मात्र या घटनेने समाजासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कार्यालया...

न्यायालयात नम्र पोलीस ठाण्यात राज्या सारखी ऐट

Image
न्यायालयात नम्र... पोलीस ठाण्यात 'राजासारखी' ऐट मत ।शिवाजी घाडगे  लोकशाही व्यवस्थेत पोलीस दल हे कायद्याचे रक्षक मानले जाते. नागरिकांच्या जीवित, मालमत्ता आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. परंतु जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच कायद्याच्या चौकटीबाहेर वागत असल्याचे आरोप वारंवार पुढे येतात, तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. मुंबई उच्च न्यायालयाने पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या प्रकरणात केलेली कठोर टिप्पणी ही केवळ एका अधिकाऱ्यावर केलेली टीका नसून, संपूर्ण पोलीस व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्याचा इशारा आहे. "पोलीस न्यायालयात नम्र होतात; मात्र पोलीस ठाण्यात राजासारखी ऐट दाखवतात," हे न्यायालयाचे निरीक्षण अत्यंत मार्मिक आहे. ही टिप्पणी एखाद्या भावनेतून केलेली नसून, न्यायालयापुढे वारंवार येणाऱ्या अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे या निरीक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना वारंवार मागणी करूनही एफआयआरची प्रत देण्यात आली नाही. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार एफआयआरची...

श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा अंत करावा लागेल

Image
श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा अंत करावाच लागेल  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि व्यसनांचा विळखा ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या राहिलेली नाही, तर ती संपूर्ण समाजासमोरील गंभीर चिंता बनली आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या भरदिवसा झालेल्या हत्येनंतर शहरात सर्वपक्षीय आणि पक्षविरहित नागरिकांनी एकत्र येत केलेला संघटित विरोध हा श्रीरामपूरच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल. हा केवळ एका हत्येचा निषेध नव्हता, तर वाढत्या गुन्हेगारीविरोधातील जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होता. श्रीरामपूरमध्ये मारामाऱ्या, खून आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना नवीन नाहीत. मात्र, भरदिवसा एका तरुण व्यावसायिकाची निर्घृण हत्या झाल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. श्रीरामपूर हे सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाणारे शहर. मात्र गेल्या काही वर्षांत या शहराची ओळख बदलू लागल्याची खंत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, अमली पदार्थांच...

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका श्रीरामपूरात जाणून घेतल्या व्यथा

Image
जिल्हा अधीक्षक मुम्मका सुदर्शन  जाणून घेतल्या श्रीरामपूरात व्यथा  सपोर्ट।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे 'नागरिकांशी संवाद साधत तक्रारी अडचणी, तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. यावेळी शहरातील विविध भागांतील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी व सूचना पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीविरोधात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून काही नागरिक व संघटनांनी गुन्हेगारांना स्थानिक पातळीवर मदत मिळत असल्याचे आरोपही केले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हा नागरिक तक्रार दिवस आयोजित केला. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्र...

खासदार शरद पवार यांनी घेतले सोपानकाका पालखीचे दर्शन

Image
गोविंद बागेत सोपानकाका पालखीचे शरद पवारांकडून प्रथमच दर्शन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी प्रथमच दर्शन घेतले आहे. पालखी गोविंद बाग येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम  प्रतिभा पवार यांनी पालखीचे दर्शन घेत वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त केला. त्यानंतर खासदार शरद पवार यांनीही पालखीचे दर्शन घेऊन वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेला अभिवादन केले. त्यांच्या या भेटीची उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये विशेष चर्चा झाली. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा वातावरणात शरद पवार यांनी प्रथमच सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्याने या घटनेकडे अनेकांनी विशेष लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात राजकीय घुसखोरी होत असल्...

देवळाली प्रवरात नगरपालिकेच्या कारभारा विरोधात भिक मागो आंदोलन

Image
देवळाली प्रवरात 'भिक मागो' आंदोलन; पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात विरोधकांचा एल्गार घाडगे न्यूज।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांच्या कथित मनमानी, एकतर्फी व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणाऱ्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील नगरसेवकांनी शनिवारी शहरात अनोखे 'भिक मागो' आंदोलन करून पालिका प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात नगरपालिका अपयशी ठरली असून प्रत्येक प्रश्नावर "पालिकेकडे निधी नाही" हेच कारण पुढे केले जाते. मात्र दुसरीकडे लाखो रुपयांचा खर्च कागदोपत्री दाखविला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक दासू पठारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हातात भिक्षापात्रे घेऊन नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भिक्षा मागितली. "पालिकेकडे विकासकामांसाठी निधी नसेल, तर नागरिकांकडून भिक्षा गोळा करून तीच रक्कम पालिकेला देऊ," असा उपरोधिक स...