Posts

Showing posts with the label नाशकात नासका बाबा

श्रध्देआडचा अधपतन अंधश्रद्धेचा गैर फायदा

Image
अंधश्रद्धेच्या आडचा अधःपात थांबणार कधी? श्रध्देधंदा। शिवाजी घाडगे  नाशिकमध्ये उघडकीस आलेले तथाकथित नाटकातील नासका  ‘बाबा’ प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारे वास्तव आहे. स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणून मिरवणारे काही भोंदू लोक, अंधश्रद्धा आणि आंधळ्या भक्तीचा आधार घेत लोकांच्या श्रद्धेचे शोषण करत आहेत—आणि हे चित्र दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे. या प्रकरणातील आरोपीने ज्याप्रकारे महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार केले, त्यातून केवळ एका व्यक्तीची विकृती समोर येत नाही; तर समाजातील विश्वासाचा गैरवापर किती सहजपणे होऊ शकतो, हे स्पष्ट होते. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, अशा लोकांच्या संपर्कात समाजातील तथाकथित प्रतिष्ठित आणि प्रभावशाली मंडळीही असतात. त्यामुळे अशा भोंदूंचे ‘जाळे’ अधिक बळकट होत जाते. अलीकडच्या काळात पारनेर आणि आता नाशिकमधील घटना या अपवाद नाहीत, तर एक धोकादायक पॅटर्न आहे. कुणी ज्योतिष, कुणी तांत्रिक, तर कुणी ‘गुरू’ बनून लोकांच्या भावनांशी खेळ करत आहे. यात सर्वात मोठा बळी ठरतो तो सामान्य, भोळाभाबडा नागरिक—विशेषतः...