Posts

Showing posts with the label mpkv तीन दिवस झाली

51 व्या संशोधन परिषदेने दिल्या मान्यता

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 5 वाण, 3 कृषि यंत्रे, आणि 69 कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषि विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठात करण्यात आले होते.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या कृषि विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली. या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 5 वाण, 3 कृषि यंत्रे अवजारे आणि 69 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. यामध्ये भात-फुले कोलम, भात-फुले सुपर पवना, मका-फुले उमेद, मका-फुले चॅम्पीयन, ऊस-फुले 13007 हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र, विद्युतमोटारचलीत फु...