भैरुनाथ पानपुरी गाडी लागत नाही हल्ली...
भैरुनाथची पानपुरी हातगाडी आता येथे आली नाही व घरासमोरुन देखील हालली नाही .... तर याचे कारण देखील असेच होते ते म्हणजे पानपुरी वाला भैय्याने अकस्मात या जगाचा निरोप घेतला कालुसिंग राणावत ऊर्फ पानपुरी वाले चित्रगुड राजस्थान वय 50 असे दुःख निधन झालेल्या भैय्याचे नाव नाव गांव इतके दिवस कोणाला ठाऊक नव्हते पानपुरी वाला भैय्या या नावाने लहान थोर हाक मारायचे. राहुरी फॅक्टरीवर समोर कै. गुलाबराव कदम यांच्या व्यापारी संकुल समोर गेल्या अठरा विस वर्षा पासुन पानपुरी गाडी नित्यान ऊभी असायची मात्र हल्ली मात्र ती तेथे नाही एकादशीच्या दिवशी सकाळीच कालुसिंग यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला काही कळनासे झाले गाडी लावण्यासाठी माल बनवण्याची घाई सुरु होती मात्र तिव्र वेदना सुरु झाल्या उपचारासाठी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यांनी त्यांना उपचारा साठी नगर, अथवा प्रवरा येथे हलविण्याचा वैद्यकीय सल्ला दिला मात्र काळ आला कि तो कुणा साठी थांबत नाही तसेच कोणाचे ऐकत देखील नाही रस्त्यात काळाने झडप घातली अण होत्याच ...