Posts

Showing posts with the label कृषी उद्योगाला चालना

सावित्री जत्रेमुळे शेती उद्योगाला अनकुल- कुलगुरु डॉ शरद गडाख

Image
सावित्री जत्रेमुळे  शेती उद्योजकतेला चालना मिळेल   कुलगुरू डॉ. शरद गडाख   १९५० मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती व अन्नधान्याचे उत्पादन ५० मिलियन टन होते. फळे व भाजीपालाचे उत्पादन २३ मिलियन टन होते व दुधाचे उत्पादन १३ मिलियन टन होते. सध्याला आपली लोकसंख्या १४२ कोटी असून अन्नधान्याचे उत्पादन ३३१ मिलियन टन, फळे व भाजीपाल्याचे उत्पादन ३५१ मिलियन टन आणि दुधाचे उत्पादन २३१ मिलियन टन आहे. फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये आपण जगात दुसरे असून दूध उत्पादनामध्ये आपण जगात पहिले आहोत. अन्नधान्य मध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. याचे श्रेय शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ व धोरण करते यांना जाते. आता ग्राहक जागरूक झाला आहे. ग्राहक अंशमुक्त उत्पादन मागत आहे. यामुळे अंश मुक्त उत्पादनाला बाजारपेठेत मागणी वाढत आहे. या फुले कृषि प्रदर्शन व सावित्री जत्रेमुळे अंशमुक्त शेतीची जनजागृती होणार आहे. यामुळे शेतकरी विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकांना अंशमुक्त शेतीचे महत्त्व कळून त्याची मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे.  या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन उद्योजकत...