Posts

Showing posts with the label आपत्कालीन

अतिवृष्टीत काळजी घ्या

जिल्ह्यात आजपर्यंत ३४३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर मध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये  पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे‌‌. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.  जिल्ह्यातील सरासरी पर्जन्याच्या 76.66% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी 12.00 वाजता जिल्ह्यातील गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४४ हजार ७६८ क्यूसेक, भिमा नदीत दौंड पूल येथून ७४ हजार ४५६ क्यूसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २७ हजार ११४, निळवंडे धरणातून २१ हजार ८५५, ओझर बंधारा येथून १ हजार ३९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे ‌‌. कुकडी नदीत येडगाव धरणातू...