नगरचे जिल्हाधिकारी कार्यालयात बाॅम्ब.... ठेवलाय
नगर।प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला गुरुवारी सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटने उडवून देण्याच्या धमकी ईमेल व्दारे आली
आणि सारे वातावरण गंभीर झाले
मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे.
असे असले तरी नेमके कशा मुळे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय बाँबस्फोट घडवून उडवून देण्याचा मेल करण्या मागचा हेतू काय कारण जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस गढुळ होत चालले असून प्रशासनाने देखील आता जागृत व्हायला हवे.
कदाचित आज स्पोट झाला नाही मात्र अशी धमकी देण्याचे धाडस तरी ईमेल करणाराने का केला नेमक झाल काय
जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला.
बॉम्ब शोधक पथकातील 'लुसी' व 'जंजीर' या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराची शोधमोहीम झाली
या सखोल शोधमोहिमेत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले.
हा प्रकार केवळ खोडसाळपणा असल्याचे प्रशासन म्हणत असले तरी परिस्थिती गंभीर आहे
Comments
Post a Comment