श्रीरामपूरात गोळी बारात बंटी जहागीरदार ठार

बंटी जहागीरदार यांची गोळ्या  झाडून हत्या हल्लेखोर पसार
राहुरी 
श्रीरामपूरात  बुधवारी  गोळीबाराचा थरार झाला असून दुपारी अडीच्या  सुमारास कब्रस्तानातील एक अंत्यविधी आटोपून परतणारे बंटी जहागीरदार यांच्यावर सेंट्लुक हॉस्पिटलच्या  गेट समोर थांबलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.या गोळीबारामध्ये ते  मरण पावले 
कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हे आपले मित्र अमीन हाजी याच्या बाईकवर मागे बसून घरी परत चालले होते.संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ ते आले असता आधीपासून तेथे उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला.दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडी वरून उतरले व त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावर भिरकावला. त्याक्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल मधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.यानंतर ते खाली कोसळले.त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉ.जगधने व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून प्रथमोपचार केले.परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना नगरमध्ये हलवण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये नगराध्यक्ष करण ससाने, मुजफ्फर शेख, अंजूम शेख, सचिन गुजर, माऊली मुरकुटे आदींनी तातडीने धाव घेतली.
गोळीबाराची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड समुदाय जमा झाला .लोकांच्या संतप्त भावना पाहता तातडीने पोलीसही ते पोहोचले पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्या ठिकाणी दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली अर्ध्या तासाच्या प्रथमोपचार्यानंतर बंटी जागीरदार यांना कार्डियाक व्हॅन मधून नगरला हलवण्यात आले त्यानंतर कामगार हॉस्पिटल मधील जमाव पांगला दुसरीकडे सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौकात सुद्धा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता .
हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर