अशील तेथुन परत फिर

लव्ह जिहादच्या मार्गावरील मुलीस पित्याचे पत्र
माझ्या हृदयस्थ बाळा,

तारुण्यातील भावजीवन भरतीच्या लाटेप्रमाणे असते. बुध्यांक (IQ) कितीही कमी असला तरी भावनांक (EQ) शिखरावर पोहोंचलेला असतो. जेंव्हा शरीरातील ग्रंथी हार्मोन्स स्रवू लागतात, तेंव्हा कामभावना आतून धक्के देऊ लागते. भावनेला प्रेमाचे पंख फुटतात, तेंव्हा नकळत पुरुष देहाचे आकर्षण वाटू लागते. सिनेमा, सिरियल व साहित्य मनाला आकार व दिशा देत असते. या संवेदनशील वयात माता पित्याने निरोगी, निकोप व स्पष्ट संवाद करणे गरजेचे असते. पण आम्ही इथे कमी पडलो. शरीरसंबंध, प्रेम, विवाह या विषयावर मुलीशी बोलायचे नाही, या परंपरेचे आम्ही पालन करीत होतो. प्रत्येक आईबापाला आपले बाळ लहान आहे, असाही भ्रम असतो. शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, परदेशातील शिक्षण हेच श्रेष्ठ ज्ञान आहे व त्या मार्गाने जाणे म्हणजेच प्रगती, असे आम्ही समजत गेलो. आपल्या धर्माचे व भाषेचे संस्कार करण्याचे मात्र विसरुन गेलो. आज त्याची किती मोठी किमत मोजावी लागते आहे, हे तुम्हाला कळणार नाही. शाळेतील गुणपत्रक, पदवी - पदाचे कौतुक व मिळकतीची प्रतिष्ठा मिरविण्यातच आमची मती मातीत गेली. घाम गाळून तुमच्या शाळा काॅलेजची फी भरली, तुमच्या खाऊचे डबे भरण्यात आई कधी थकली नाही. कर्ज काढून लग्न करण्याची तयारी ठेवली. पण बाळानो, तुम्ही मात्र आम्हाला दु:खाच्या नरकात ढकलून, अल्लाच्या जन्नतकडे निघालात. जिहादी प्रेमाच्या भयंकर चक्रयुव्हात अडकत चाललात. स्वातंत्र्याचे ढोल बडविणार्‍या स्रीमुक्तीवाद्यानी कुटुंबाला तुरुंग व पित्याला जेलर ठरविले. मुलींना मुलाइतके हक्क देऊ केले. पण कर्तव्याची जाणीव कुठे दिली ? भारतीय परिवार तोडण्यात ते यशस्वी झाले.

तुम्हाला झाकीर नाईक व्यास वाल्मिकीहून ज्ञानी वाटला ? अब्दुल, आफताब हे राम वा कृष्णाहूनही पुरुषार्थी वाटले ? मोठ्या शर्थीने, प्राणाची बाजी लाऊन आपल्या पूर्वजानी सनातन धर्म व देश टिकविला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, दयानंद, विवेकानंद हे महात्मे व दाहीर, सुहेल देव, बप्पा रावल, राणा प्रताप, संभाजी राजे, अहिल्याबाई हे राजे आपले आदर्श आहेत. पैशासाठी पडद्यावर नाचणारे दीडदमडीचे कलाकार नाहीत. सेकुलर शिक्षणाने तुम्हाला सांगीतले की, " माॅयनॅरिटी (इस्लाम) की रक्षा करना हिंदूओंका धर्म है ।" पण तुम्हाला हे सांगीतले नाही की, " काफिरोंको मिटाना इस्लाम का फर्ज है ।" मंदिरात जा किंवा नको जाऊ, पण रामायण वाच. तुम्हाला लिहायला, वाचायला शिकविले आहे ना ? शिक्षणाचा गर्वच असेल तर भगवदगीता वाच. त्यानंतर कुराणही वाच. तुला कळेल की, कुराण काफिराच्या अंत्यविधिचा जाहिरनामा आहे. ज्याने भगवदगीता वाचली, त्याने हिंदू धर्म स्विकारला. ज्याने कुराण हदीस वाचले, त्याने इस्लाम सोडला. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गर्जना करणारे, कुराणविषयी बोलणार्‍याचा ' सर तनसे जुदा ' करतात. गुन्हेगाराच्या पाठीशी उभे रहाणार्‍या राजकीय पक्षांचे व देशद्रोही वकीलांचे कारनामे तुला समजणार नाहीत. कारण तुम्ही मुली बातम्याच पहात नाही. भारताचे राजकारण केवळ सत्तेचा खेळ नाही, सांस्कृतिक संघर्ष आहे. हे समजून घेण्यास तुझे (तथाकथित) शिक्षण कुचकामी ठरते आहे.

सुदैवाने जेंव्हा आमच्या खिशात पैसा खुळखुळू लागला, तेंव्हा आम्ही मंदिराकडे पाठ फिरवून तुला माॅलमध्ये फिरवू लागलो. फॅशनेबल कपडे चढवून कौतुकाने मिरवू लागलो. देवदर्शन करण्यापेक्षा सेल्फीत रमू लागलो. तुमच्या पीढीला कथा किर्तनाला जाणे मागासच नव्हे तर वेडगळपणाचे वाटू लागले. हा आमचाच अपराध आहे. सांस्कृतिक अपराध म्हणा हवं तर. देवधर्म म्हणजे अंधश्रध्दा व साधू संत म्हणजे ढोंगी व लंपट माणसे, असे चित्रण करण्यात वामपंथी यशस्वी झाले. तारुण्यसुलभ उछ्रंखलपणाला कायद्याने मान्यता दिली आहे. पण माणसातील पशुत्वाला नीतिधर्मच रोखू शकतो. हा समाज अभयारण्य नाही. सावज शोधणारे लांडगे आजूबाजुला आहेत, हे गृहीत धरुन तू सावध रहा. पोलीस व कायदा आपले रक्षण करील, अशा समाजवादी भ्रमात राहू नकोस. होय आमचे चुकले. श्रीरामचंद्राच्या सोबत काट्याकुट्यातून चालणारी सीता आम्ही तुला दाखविली नाही. त्यामुळे तुम्ही गुळगुळीत फरशीवरही चप्पल घालून चालण्याइतके माॅडर्न झालात. आम्ही भारतीय लोक कपडे घालतो ते शरीर झाकण्यासाठी, अंग दाखविण्यासाठी नाही. पाश्चात्यांचा नागडेपणा व इस्लामचा बुरखा असा अतिरेक न करता मध्यम मार्गाने जातो. पण हे तुला कसे समजावे ? अमेरिकेतील तुमच्या पॅकेजेसचे आम्हाला कांहीही कौतुक नाही. कारण तुमची मुले - नातू हिंदू धर्म सोडणार, हे क्रमप्राप्त आहे. बाळंतपण करुन घेण्यापुरते गोड बोलणारी तुमची ' Dollar is career ' संस्कृती आम्हाला मान्य नाही.

कुणाल काम्रासारख्या मूर्ख माणसाच्या स्टँडअप काॅमेडीवर तू उत्स्फूर्तपणे हसत होतीस, तेंव्हा आमच्या संस्कृतीवर थुंकत होतीस. तेही आम्ही सहन केले. जेंव्हा तू हिजाब घालून फिरु लागलीस, तेंव्हाही दुर्लक्ष केले. " क्या प्यार रिलिजन देख के होता है ? " असे म्हटलीस तेंव्हाच माझ्या काळजाचा ठोका चुकला. पण हे ' इंटेलेक्चुअल ' वक्तव्य असावे, अशी स्वत:ची समजूत घातली. हिंदू म्हणजे जाती, सती, मूर्ती, अंधश्रध्दा एवढ्या मर्यादित ज्ञानावर तू वाद घालू लागलीस, तेंव्हा तुझे पूर्ण ब्रेनवाॅशिंग झाल्याचे लक्षात आले. शाळा काॅलेजचे शिक्षण (गणित विज्ञान) पुरेसे नाही, नीति, धर्म, परंपरा शिकविणे आवश्यक होते, हे लक्षात आले. पण तेंव्हा फार उशीर झाला होता. तुझ्या शिक्षणासाठी कष्ट करणारा पिता अप्रिय होऊ लागला. पण वाढदिवसाची गिफ्ट देणारा बाॅयफ्रेंड प्रिय वाटू लागला. जेंव्हा तू फोन उचलायची नाहीस, तेंव्हा तुझी आई कावरी बावरी होऊन जायची. ज्यादिवशी तुला पहायला पाहुणे येत, त्या दिवशी ती देव्हार्‍यापुढे बसून रहायची, प्रार्थना करायची, नवस बोलायची. तुझा नकार ऐकून ढसाढसा रडायची. पण आम्ही मूर्ख, बावळट पालक, तुझ्या नकाराच्या कारणाचा शोध कधी घेतला नाही. ' हिंदू कहने मे मुझे शर्म आती है ' असे म्हटलीस, तेंव्हा आमचे हृदय पिळवटून निघाले. आमच्याही समाजाचे चुकले. कांहीनी लग्नासाठी अवास्तव हुंड्याची मागणी केली तर कुणी मुलीला ' पराया धन ' म्हटले. मग हे धन कुणीतरी लुटून नेणारच. आमचाच मूर्खपणा होता तो. आमच्या ऐपतीप्रमाणे जे जे शक्य होते ते सर्व केले. तरीही आम्हाला मागास, कंजूष म्हणून तू हिणविलेस. तेही मुकाट्याने सहन केले. आता तर तुझी भाषाच बदललीय. my career, my decision पासून सुरु झालेला प्रवास my body, my choice पर्यंत पोहोचला आहे.

आम्ही तुला संगीत शिकविले, स्वयंपाक नाही शिकविला. नकली प्रेमाचे सिनेमे दाखविले, लव्ह जिहादचे धोके नाही समजाविले. तुला स्कुटी चालवायला शिकविली, पण काठी चालवायला नाही शिकविली. तुमच्या शाळेच्या पुस्तकाने ' सती 'प्रथेची निंदा केली, पण ' निकाह हलाला ' मात्र लपविले. पुरोगाम्यानी सरस्वतीची पूजा बंद करविली. हिंदूच्या धार्मिक श्रध्देवर आघात केले. दगडात देव असतो का, असे विचारायला शिकविले पण झेंड्यात देश असतो का, असा प्रतिसवाल करण्याचे धाडस दिले नाही. धार्मिक प्रतिकांचा अर्थ कधी समजाविलाच नाही. ' बांगड्या घातलास का ?' असा वाक्प्रचार करुन बांगड्या म्हणजे दुबळेपणाचे प्रतिक, असा अर्थ रुढ केला. साडी घालणार्‍या मुलीना काकुबाई म्हणून हिणविले.  कुंकु, मंगळसूत्र गुलामीचे चिन्ह झाले. हिंदू जीवनशैलीची टिंगल करणे विचार स्वातंत्र्य झाले. ' लिव्ह इन रिलेशन ' सारखे पशूवत वागणे आवडू लागले. निकिता तोमर, नीतू, मानसी, तनिष्का, नयना कौर, प्रिया सोनी, शिवानी खुबिया, दीक्षा मिश्रा, बाबील राणी, वर्षा चौहान अशा शेकडो हजारो मुली जीवनातून उध्वस्त झाल्या, मातीत गेल्या, त्यांच्यासाठी आम्ही कांही करु शकलो नाही. पण ज्या जाण्याच्या वाटेवर आहेत, अजून निरागस (innocent) आहेत. त्या प्रेमाच्या भुलाव्याने संकटात पडत आहेत. एका गुन्हेगारी टोळीत प्रवेश करीत आहेत, त्याना इषारा देत आहोत.

जिहादी प्रेमाची नशा सेक्युलॅरिजमच्या दारातून प्रवेश करते व शेवटी आत्मघाती बाँब होण्यापर्यंत पोहोचते. शरीर परमात्म्याचा प्रसाद आहे, भोगाची वा खेळण्याची वस्तू नाही, असे आम्ही मानतो. पण हे तुला कसे समजेल ? जिहाद्यांची रणनीति खूप गुंतागुंतीची आहे. तुला फक्त अब्दुला, आफताब पासूनच नव्हे तर सलमा, नगमा पासूनही सावध रहावे लागणार आहे. त्या मैत्रिणी नसून मायावी दुनियेतील विषकन्या असू शकतात, मारीच असू शकतात. आता मारीच कोण होता, हेही तुला सांगावे लागेल. जेवढे बोलावे, लिहावे तेवढे कमी आहे. पण प्रत्यक्ष भेटीतूनच ते शक्य आहे. बाळा, आधीच खूप नुकसान झाले आहे. एकेक बातमी वाचून, ऐकून काळजाचा थरकांप होतो. श्रध्दाच्या कोवळ्या शरीराचे पस्तीस तुकडे केलेल्या आफताबची (जिहादी) मोहब्बत दूरदर्नवर पाहून तुझी आई धाय धाय रडली. इतका मोठा मानसिक धक्का बसला की, हल्ली ती फ्रीज उघडायलाही घाबरते. ' सेक्स स्लेव्ह ' काय असते, हे पहाताना काळीज चिरत गेले. स्री शरीराची दैना व विटंबना करण्याचा या जंगली जमातीने चंग बांधला आहे. पण हे कटूसत्य समजण्याइतकी तू सूज्ञ नाहीस. म्हणून हे तळमळीचे लिहणे. हजार चुकासह तुला आमच्या पंखाखाली घेण्यास तयार आहोत. आईची माया आभाळाएवढी असते, हे काव्य नाही, सत्य आहे. म्हणून तू ज्या टप्प्यावर असशील, तेथून परत फिर. It is never late, before death. I hope my tears will reach and touch your heart.
---- तुझ्यासारख्या अनेक चिमण्यांचा दुर्दैवी पिता ....

(कृपया हे पत्र आपल्या संपर्कातील सर्व व्यक्ती व ग्रूपवर पाठवा. धर्म, देश व संस्कृती वाचवा.) 
प्रकाशक - डाॅ. व्यंकट कोलपुके.  (भ्रमणध्वनी ९८६०२०८४०८)

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार