अंधश्रद्धेच्या आड वाढलेली गती शेवटी करी अधोगती
अंधश्रद्धेच्या आड वाढलेली गती
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
राज्यात सध्या गाजत असलेले तथाकथित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या फसवणुकीपुरते मर्यादित नसून, समाजातील अंधश्रद्धा, सत्ताधाऱ्यांशी असलेली साटेलोटे आणि प्रशासनातील संशयास्पद संबंध यांचे विदारक वास्तव उघड करणारे आहे. भविष्यकथन, अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या आडून उभारलेले हे कथित साम्राज्य आता कोसळण्याच्या मार्गावर आहे; मात्र या निमित्ताने अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत.
राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध ही बाब अधिक चिंताजनक
राज्यातील काही मंत्री आणि बड्या राजकीय नेत्यांच्या भविष्यकथनाच्या नावाखाली, तसेच महिलांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या तथाकथित ‘भोगू बाबा’ प्रकरणामुळे त्याच्या भक्तांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता पसरली आहे. शिर्डी परिसरात अलीकडेच तीन आयएएस अधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा रंगू लागली असून, या बैठकीमुळे प्रकरणाला अधिकच गूढ व गंभीर वळण मिळाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहुरी येथे पूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले आणि सध्या ठाणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावावर, तसेच भोगू बाबा उर्फ कॅप्टन अशोक खरात यांच्या मुलीच्या नावावर नाशिकजवळील पार्थडी शिवारात संयुक्तरित्या जमीन असल्याची माहिती पुढे आली आहे. या आर्थिक व्यवहारांमुळे प्रशासन आणि तथाकथित बाबा यांच्यातील संबंधांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित उपजिल्हाधिकारी राहुरीत तहसीलदार असताना सोनगाव नदीतील बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे अशा प्रकारचे आणखी किती अधिकारी आणि भोगू कॅप्टन यांच्यात सामायिक मालमत्ता व्यवहार झाले आहेत, याचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा चौकशीमुळे भविष्यात सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“बुवा तेथे बाया” या म्हणीप्रमाणे, या प्रकरणातही अनेक महिलांना फसवले गेल्याचे आरोप समोर येत आहेत. कथित अध्यात्म, अंकशास्त्र आणि तथाकथित ‘अंगशास्त्र’ यांच्या आडून महिलांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक महिलांना ‘पाणी पाजणे’ अशा प्रकारच्या विधींमधून भुलवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला असून, “आपल्या जवळच्या व्यक्तीची फसवणूक झाली” अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र, इतकी मोठी संपत्ती आणि व्यवहार सुरू असताना याची कल्पना नव्हती का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित ५८ व्हिडिओ क्लिप्स आणि ६० हून अधिक मालमत्ता उतारे (सातबारा) समोर आल्याची माहिती आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिराजवळ उभारलेले आलिशान फार्महाऊस, आंब्याची बाग आणि त्यासाठी केलेली विशेष पाण्याची व्यवस्था यामुळे भोगू कॅप्टनच्या आर्थिक साम्राज्याचा अंदाज येतो.
भोळ्या-भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत स्वतःचे आलिशान साम्राज्य उभे करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात उर्फ भोगू बाबा यांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) संपूर्ण प्रकरणाचा छडा लावेल ऑफिस बाॅय निरज जाधव याच्या मोबाईल मध्ये 40 महिलांचा तपास समोर आला असून जाधव हा निरप्या म्हणून काम करायचा
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या तपासातून सत्य समोर येऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, अशीच जनतेची मागणी आहे.
तसे नाशिक मध्ये काही अधिकारी हनी टॅप मध्ये तर बायकाचे भवितव्य भविष्यवाल्याच्या हातीत शेवटी लोकांचे रक्त शोषणु अनैतिक मार्गाने कमववलेली संपत्ती सुख देत नसते ती दुःख च देते
आज हातावर मोजणारे राजकारणी व अधिकारी प्रामाणिक व लोक हिताचे काम करतात बाकी सारे लोक हे भोग कृत्य निमुट पणे सारे असाहय पणे पाहून सहन करत आहेत कारण बाबा बिबी राजी तो क्या करगे लोग कारण लोक आमचे काहीच करु शकत नाही हा भ्रम निर्माण झाला असून तो देखील वेळीच दुर करणे गरजे आहे.
Comments
Post a Comment