महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्प अव्वल

कडधान्य सुधार प्रकल्पांतर्गत तुर व हरभरा संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन
राहुरी-
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन प्रकल्पाअंतर्गत तूर व हरभरा योजनेला भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपुर यांचे पंचवार्षिक संशोधन आढावा अहवालानुसार उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या संस्थेचा पंचवार्षिक संशोधन आढावा अहवाल नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे.
कडधान्य सुधार प्रकल्पाकडे आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात तूर आणि रब्बी हंगामात हरभरा पीकावर संशोधनाचे कार्य चालते. कडधान्य सुधार प्रकल्पाची स्थापना सन 1973 साली झाली. सन 1982 साली आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. हरभरा पिकाचे मुख्य संशोधन केंद्र म्हणून 1994 साली तर तूर पिकाचे उपकेंद्र म्हणून 2002 साली आणि मुख्य केंद्र म्हणून 2015 मध्ये भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली. कडधान्य पिकांमध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, मटकी, चवळी, कुळथी आणि राजमा या पिकांच्या एकूण 49 वाणांची शिफारस या प्रकल्पामार्फत देण्यात आली आहे.
या प्रकल्पाने हरभरा पिकामध्ये शेतकर्यांमध्ये लोकप्रीय असे 14 वाण विकसीत केलेले आहेत, यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान असलेला वाण विजय, आकर्षक टपोरा वाण दिग्विजय, विशाल, यांचा समावेश आहे. तसेच यांत्रीक पध्दतीने कंबाईन हार्वेस्टर कापणी करणेस योग्य फुले विक्रम हा वाण सन 2019 साली राष्ट्रीय वाण म्हणून प्रसारीत करण्यात आला. कोरडवाहू क्षेत्रासाठी विजय वाणाला समतुल्य फुले विश्वराज हा वाण सन 2021 साली प्रसारीत करण्यात आला आहे. अधिक उत्पादनक्षम, मर रोग प्रतिकारक्षम फुले विक्रांत वाण सन 2017 मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे.
तूर या पिकामध्ये मर व वांझ रोग मध्यम प्रतिकारक्षम एकूण 6 वाण या प्रकल्पाने प्रसारीत केलेले आहेत. यापैकी फुले राजेश्वरी हा राष्ट्रीय वाण 2012 साली प्रसारीत करण्यात आला. सन 2022 साली फुले तृप्ती हा वाण भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांसाठी प्रसारीत करण्यात आला. या वाणांपासून सरासरी 22.60 क्विंटल धान्याचे उत्पन्न मिळते.
हरभरा पिकामध्ये केलेले भरीव संशोधन आणि दिलेल्या शिफारशी यामुळे आखिल भारतीय समन्वीत रब्बी कडधान्य पीक वार्षीक आढावा बैठकीत मफुकृवि, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्प, समन्वित हरभरा संशोधन योजनेला आखिल भारतीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्र या पुरस्काराने गौरविण्यात आले. कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एन.एस. कुटे यांनी सांगीतले की कडधान्य संशोधन प्रकल्पाने गतवर्षामध्ये केलेल्या भरीव संशोधनाचे फलीत म्हणूनः उत्कृष्ट संशोधन केंद्र पंचवार्षीक मानांकन व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट संशोधन केंद्र असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाने पुढील संशोधनाची आखणी करत असून यामध्ये प्रामुख्याने मर व वांझ रोग प्रतीकारक कमी कालावधीत पक्व होणारे तुरीचे वाण निर्मीती तसेच हरभरा पिकात मर, मुळकुज व मानकुज रोगास आणि अवर्षणास प्रतिकारक वाण निर्मीती करणे, पीक पैदास शास्त्रातील गतीमान पध्दतीने संकराच्या पिढ्यांचे जतन आणि वाढ (स्पीड ब्रिडींग) करणे यावर संशोधन सुरु आहे. 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार