देवळाली प्रवरा मराठी व उर्दु शाळेच्या वतीनी पुरस्कार

प्रशासकीय गौरव पुरस्कार सुदर्शन जवक यांना तर  सुप्रिया आंबेकर,असिफ शेख यांना शिक्षक गौरव पुरस्कार जाहिर 

मराठी व उर्दु शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने दिले जाणारे गौरव पुरस्कार 
      देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी व उर्दु शाळेच्या  व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रशासकीय गौरव पुरस्कार देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक  यांना तर  मराठी शाळेतील शिक्षिका सुप्रिया आंबेकर व उर्दु शाळेतील शिक्षक असिफ शेख यांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जाहिर करण्यात आले.
              देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी व उर्दु  शाळेत एकञित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  अँड विनोद शेटे  हे होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा शोभा मोरे, माजी अध्यक्ष सुनिल शेटे,अमोल भांगरे, प्रमोद गाढे, सुनिल कांबळे,रंजना कांबळे,अश्विनी निकाळे,योगिता तरस, केंद्र प्रमुख गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख, उर्दुचे मुख्याध्यापक इमाम अब्दुल रहमान सय्यद आदी उपस्थित होते.  
                  शाळेतील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गिते सादर केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पञकार राजेंद्र उंडे  यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त प्रशासकीय अधिकारी  गौरव व शिक्षक गौरव   पुरस्कार जाहिर केले. याच वर्षा पासुन मराठी व उर्दु शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रशासकीय व शिक्षक गौरव पुरस्का घोषणा करण्यात आली.यामध्ये प्रशासकीय गौरव पुरस्कार देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक तर  मराठी शाळेतील शिक्षिका सुप्रिया आंबेकर व उर्दु शाळेतील शिक्षक असिफ शेख यांना  शिक्षक गौरव पुरस्कार यांना जाहिर करण्यात आले.
        मराठी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन पुढील आठवड्यात  घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमात खा.सदाशिव लोखंडे, आ.लहु कानडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदींच्या प्रमुख उपस्थित वितरण केले जाणार आहे.
           निवड झालेल्या प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक व शिक्षक सुप्रिया आंबेकर व असिफ शेख आदींचे पालक नागरिक यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार