आमदार शिवाजी कार्डिले यांना आवडली राहुरी अण राहुरीला कार्डिले
रविवार विशेष घाडगे न्यूज
@ शिवाजी घाडगे
अलिकडेच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मी राहुरी सोडणार नाही मतदार संघाची पुर्णर रचना होणार आहे आणि मी तीकडे जाणार आहे अशा वावड्या कोणी तरी उठवत आहे तेव्हा मी कोठेही जाणार नाही असे एका कार्यक्रमात ठणकावून सागितले
आमदार शिवाजी कर्डिले हे
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे वास्तव्यास आहेत म्हणजे राहुरीत नाही असे असताना देखील ते राहुरी विधानसंभा मतदार संघात आमदार म्हणून तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत म्हणजे आमदार झाले आहेत तसे त्याचे शिक्षण देखील अल्प मात्र माणुसकी शाळेचे ते हेडमास्तर आहेत
मागील वेळेस माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडुन आले पहिले अडीच वर्ष ते राज्य मंत्रिमंडळात देखील होते अचानक शिवसेनेचा एक गट बरोबर घेत माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पन्नास आमदार बरोबर घेऊन भाजपाला जाऊन मिळाले व मुख्यमंत्री झाले नंतर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार घेऊन गेले म्हणजे दोन मातब्बर पक्ष भाजपाने केद्रीय नेतृत्वाच्या मदतीने आपलेसे केले व नंतर देखील एकत्र आले फरक इतकाच झाला बहुमता मुळे भाजपाचा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले
असे असले तरी नगर जिल्ह्यात बहुतांशी आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घड्याळा बरोबर राहीले मात्र माजी आमदार प्राजक्त तनपुरे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत राहुरी मामाच्या मदतीने खंबीर पणे मशाल हाती घेऊन राहीले तस या निवडणुकीत विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले माजी आमदार होते ते गाफील राहीले नाहीत दक्षिण पराभव आल्यावर माजी खासदार डॉ सुजय विखे पा यांची नजर आगोदर राहुरी वर गेली व आपण राहरी व संगमनेर येथून विधान सभा लढविणार असल्याचे माध्यमात झळकले अण आमदार शिवाजी कर्डिले यांनी डोक्यावरची टोपी झटकत पटकन माजी खासदार डॉ सुजय विखे पा यांना संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा मतदार संघ सुरक्षीत असल्याचे अप्रत्यक्ष रित्या सुतोवाच केले
हिंदुत्व मुद्यावर आमदार शिवाजी कर्डिले यांना मतदार संघातीत पुन्हा आपली पकड शाबूत ठेवता आली आता आमदार शिवाजी कर्डिले राहुरी विधान संभा मतदार प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांना तब्येत साथ देत नसल्याने उपचारार्थ रुग्णालयात राहवे लागते अस असल तरी मध्यतरी कोणी तरी आपल्याकडे खासदार व आमदार राहुरीचा नाही अशी टुम काढली होती व आता माजी आमदार प्राजक्त तनपुरे नगर मनमाड राज्य मार्गावरील रस्ता प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले आहेत अशात भाजपच्या मुळ व्यक्तीला पुढील उमेदवारी द्यावी अशी मागणी पुढे आल्याने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने भाजपात गेलेले आमदार शिवाजी कर्डिले हे मात्र आपला हक्क सोडायला तयार नाहीत उलट चिरंजीव अक्षय यांना देखील डावपेच शिकवत आहेत तसे राहुरीतील प्रस्तापित नेते मंडळी एक मेकांना पाण्यात पाहतात व कार्यकर्त्यांचा उपयोग वापरा अण बाजुला सारा असा केल्याने सगळेच शांत झाले आहेत
मतदार संघ पुर्णर रचनेत मी तीकडे जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत मी तीकडे जाणार नाही व राहुरी सोडणार नसल्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी शहरातील एका कार्यक्रमात व्यक्त केले म्हणून तर राहुरी आवडे कर्डिलेंना व कार्डिले आवडे राहुरीला असे आज तरी पहावयला मिळते कारण हळु हळु आ. कर्डिले यांनी शेजारील तालुक्यातील मोठे झाडे सुकून टाकले आहेत ते संभापती प्रा राम शिंदे यांच्या मदतीने असे असले तरी आरोग्यविषयक डाॅक्टरांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे शेवटी वय अण आरोग्य पुढ कोणीही व्यक्ती हतबल होत असतो तसे ते देखील झाले असतील ते चेहर्यावर दिसुन येत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूत आमदार शिवाजी कर्डिले आपल्या मानणाऱ्या कार्यकत्यांना तिकटे देणार आहेत म्हणजे अडचण नको संध्या मुळा प्रवरा वीज संस्था अवसायनात गेली असून ती जिल्हा सहकारी बँकने घ्यावी असा सुर आहे कारण मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कार्यालयातुन आमदार शिवाजी कर्डिले कारभार पाहतात मुळा प्रवरा वीज संस्था सहकारी मालकीची राहावी असे अनेकांना वाटते
राहुरी बद्दल आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मनात शंका का आली हा देखील प्रश्न आहे का झाले असतील ते भावनिक आमदारकीची निवडणूक व पुर्णर रचनेला अजून अवकाश असला तरी मी राहुरी सोडणार नाही हे जसे आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले तसे राहुरीचे मुलभुत प्रश्न ही मो सोडणार नाही अस म्हणु नका म्हणजे झाल कारण नगर मनमाड राज्य मार्ग प्रश्न सर्दभात अधिकाऱ्याची बैठक बोलवायला तुम्ही कोणाला घाबरणार नाहीत असा विश्वास राहुरीला आहे अधिकारी कोणाचे एकत नाहीत उडवा उडवीचे उत्तरे देतात दीड दीड कोटी रुपये साधे पोलीस ऑनलाईन स्विकारतात
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होतानाचे मोठमोठी होल्डर राहुरीत लागले आहेत मात्र याच राहुरीत एका तालमीत छत्रपतीची विटबना करणारा अज्ञात अरोपी मोकाट आहे शासकीय
कमिट्यावर अजुन अशासकीय सदस्य नियुक्त नाहीत या सह अनेक प्रश्न आहेतच तनपुरे यांनी काहीच केले नाही हे लोक किती दिवस ऐकतील तुम्हाला जशी राहुरी सोडावाशी वाटत नाही तसे राहुरीचे प्रलंबित
प्रश्न सुटावेत असे लोकांना वाटते नवीन रोजगार उपलब्ध करून द्यावे लागतील देशात संशोधनात अग्रणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला अद्याप कुलगुरू नाही
तर बघुया पुढे काय होते ते कारण काळाच्या पोटात काय दडले आहे हे कोणालाच सांगता येत नाही
Comments
Post a Comment