पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले तुरी चे लोकार्पण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेहस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तुरीचा फुले पल्लवी आणि चारधारी वालाचा फुले श्रावणी या वाणांचे शेतकर्यांसाठी लोकार्पण
@ शिवाजी घाडगे 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला तुरीचा वाण फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) आणि क्षमता असणार्या पिकावरील संशोधन प्रकल्पाने विकसीत केलेला चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यु.बी. 17-18)पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला. नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या (पुसा) प्रक्षेत्रावर पंतप्रधानाच्या हस्ते हे लोकार्पण  झाले. 

हवामानाला अनुकुल, योग्य उत्पादन देणारे, किड व रोगांना कमी बळी पडणारे आणि जैवसंवर्धनयुक्त वाण विकसीत करण्यावर संशोधनाचा भर असावा असे  पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी 61 पिकांच्या 109 वाणांचे लोकार्पण करण्यात आले. यामघ्ये 34 शेतपिकांचा आणि 72 बागायती उद्यानविद्या पिकांचा सामावेश आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु. डॉ. पी.जी. पाटील यांचे नेतृत्वात आणि माजी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विद्यमान संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्प येथून विकसीत झालेल्या दोन वाणांचा सामावेश  

      तुरीचा फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) हा वाण मध्यम पक्वता कालावधी (157 ते 159 दिवस) असुन देशाच्या मध्य भारतातील  महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यात बागायत आणि जिरायत क्षेत्रासाठी लागवडीकरीता शिफारस करण्यात आली आहे. या वाणापासुन प्रति हेक्टरी 21.45 क्विंटल सरासरी उत्पादन मिळते. दाणे टपोरे फिकट तपकिरी रंगाचे आहेत. मर व वांझ या तुर पिकातील प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो. 

तसेच चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यु.बी. 17-18) हा वाण बागायती उत्तम पाण्याचा निचरा होणार्या क्षेत्रासाठी विकसीत केलेला आहे. हा वाण अधिक उत्पादनक्षम असुन हिरव्या शेंगाचे प्रति हेक्टरी 142.96 क्विंटल उत्पादन मिळते तर वाळलेल्या दाण्यांचे प्रति हेक्टरी 13.81 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण 24.95 टक्के आहे. या वाणावर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव आढळुन आला

 नाही.
फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) हा वाण विकसीत करण्यामध्ये कडधान्य प्रकल्पाकडील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन.एस. कुटे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. व्ही.एम. कुलकर्णी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक  वाय.आर. पवार, तुर रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही.ए. चव्हाण, तुर किटकशास्त्रज्ञ डॉ. सी.बी. वायळ आणि कृषि सहाय्यक  वसंत भोजने यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

 तसेच वालाचा वाण विकसीत करण्यामध्ये क्षमता असणार्या पिकावरील संशोधन प्रकल्पाकडील पीक पैदासकार डॉ. एम. टी. भिंगारदे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश दोडके, सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाय.जी. बन, कृषि सहाय्यक बी.आर. अडसुरे आणि एस.एस. वेताळ यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. 
 "या दोन वाणांचे पंतप्रधान  नरेद्र मोदी यांचे शुभहस्ते राष्ट्राला लोकार्पण ही महात्मा फुले कृषि विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे विद्यापीठाचे संशोधन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी आणि वाण प्रसारास चालना मिळणार आहे.
 -कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार