खासदार कोण आज पास नापास

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. 37-अहमदनगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे  एक हजार पाचशे अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आहे.
  मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर 38-शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.3 मध्ये होणार आहे.  
एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल
३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात  222-शेवगाव पाथर्डी,  223-राहुरी, 224-पारनेर, 225-अहमदनगर शहर,  226-श्रीगोंदा व 227-कर्जत जामखेड असे सह विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच 38-शिर्डी लोकसभा मतदारसंघात 216-अकोले, 217-संगमनेर, 218-शिर्डी, 219-कोपरगाव, 220-श्रीरामपुर व 221-नेवासा असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.  प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत. 
मतमोजणी फेऱ्या
  विधानसभा मतदार संघ निहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. 38-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 216-अकोले, 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, 217-संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेऱ्या, 218-शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या, 219-कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेऱ्या, 220-श्रीरामपुर 311 मतदान केंद्र 23 फेऱ्या तर 221- नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या होणार आहेत. 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील 222-शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, 223-राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, 224-पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या,, 225-अहमदनगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेऱ्या, 226-श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या तर 227-कर्जत जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेऱ्या होणार आहेत.  


Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार