राजकारणातली धुरंधर हरपला राहुरीचे भाजपा शिवाजी कर्डीले यांचे दुःख निधन

राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन 
  बातमी दुःखद/घाडगे न्यूज 
@ पत्रकार शिवाजी घाडगे 
जिल्हाचे धुरंधर नेते भाजपा आमदार तथा जिल्हा बॅकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भानुदास कर्डीले वय ६७ यांचे शुक्रवारी पहाटे हदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक पसरला   असून गेली ४० वर्ष हा माणूस न थकता जनते साठी उन वारा पावसात खंबीर पणे पाठीमागे उभा राहीला 
तसा जनता हाच आपला पक्ष म्हणून राजकारणात सुरुवात केली अपक्ष, राष्ट्रीवादी, भाजपा, जिल्हा विकास आघाडी अस करीत आपले राजकीय बस्ताना पक्के केले. 
ते आमदार होते एक दुधविक्रेता ते मंत्री असा त्यांचा जीवन प्रवास राहीला. 
नगर जिल्ह्य़ातील एक सर्घष शिल व्यक्तीमत्व स्पष्ट वक्ता खमक्या आमदार म्हणून त्यांची ओळख होती पहिल्यांदाच अपक्ष म्हणून ते निवडुन आले एक आपवाद वगळतात्यांना पराभव माहीत नव्हता जिल्ह्य़ातील प्रस्तापित राजकारण्यांना त्यांनी पराभुत केले होते 
 बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत सरपंच म्हणून राजकारणात पदार्पण झाले
जावा गाडीवर गांधी मैदानावर दुध घेऊन येणार शिवा जन्म माणसाच्या प्रेमावर आमदार झाला ते मागे वळुन पाहीलेच नाही. 
शिवाजी कर्डीले ४० वर्ष आमदार राहीले तर लोकसंभा निवडणूक त्यांना पराभव आला मात्र पराभवाने न खचता त्यांनी आपल्या कामाला सपाटा लावला. 
लगेच त्यांनी राहुरीत विधानसंभा निवडणूक लढवून विजय संपादन केला त्यांनी सर्व सामान्य लोकांना बरोबर घेऊन राजकारण केले जो कोणी काम घेऊन येईल त्याचे काम केले ना त्याचा पक्ष पाहीला न जात अतीशय स्पष्ट व कार्यकर्त्याना जीव लावणारे आमदार शिवाजी कर्डीले गेले काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार घेत होते अचानक त्याची तब्येत बिघडली अण त्यांनी जगाचा निरोप घेतला .
कायम आजोबा व आईच्या बद्दल त्यांना नितांत आदर होता आपल्या घरी आलेला व्यक्ती निरमूखी पाठवायचा नाही ही कुटुंबातील परपरा त्यांनी कायम राखली आता ही दिवाळी फराळाचे निरोप येण्या आत शिवाजी कर्डीले यांनी जगाचा निरोप घेतला कोणतीही राजकीय परिस्थितीत नसताना राजकारणात हा तारा राजकीय पटलावर कायम चमकत राहीला जिल्ह्यातील काना कोपऱ्यात त्यांचा हक्काचा माणुस होता पहिलवान असलेल्या शिवाजी कर्डीले यांच्या वर नियतीने डाव टाकला. 
त्याच्या पच्छात पत्नी,मुलगा, तीन मुली, तीन जावाई असा मोठा परिवार असुन नगरचे आमदार संग्राम जगताप, उद्योजक संदीप कोतकर,यांचे ते सासरे तर युवा नेते अक्षय कर्डीले यांचे वडील होत 
बुरानगर सारख्या ग्रामीण भागातून व्यापक जनसंपर्क वाढवत त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता.  व्यापक जनसंपर्क असलेला नेता  नगर जिल्ह्यानं गमावला आहे. 
आमदार कर्डिले यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता बुहानगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. 
दरम्यान, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर