दुध विक्रेत्या शेतकऱ्यांने ग्राहकांना दिवाळी निमित्त दिल्या किटल्या भेट
"सुखद बातमी"
घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे
दिवाळीत मोठ मोठ्या कंपन्या, व्यावसायिक, उद्योजक, राजकीय मंडळी आपल्या स्नेही जणांना दिवाळी भेट देऊन यंदाची दिवाळी साजरी केल्याचे आपण पाहीले असे असताना मात्र
राहुरी फॅक्टरी येथील गोपालक दुध विक्रेत्या शेतकऱ्यांने आपल्या दैनंदिन ग्राहकांना किटली भेट देऊन दिवाळी साजरी केली अजीत वरखडे यांनी
किटली मुळे आपण देवळाली नगर पालिकेच्या पॅलस्टीक मुक्तीला हातभार लावणार असल्याचे त्यांना वाटते पॅलस्टीक आपल्या व जनावरांच्या आरोग्याला घातक आहे कधी कधी गाईच्या पोटातून पॅलस्टीक गोळा डाॅक्टरांनी बाहेर काढल्याच्या घटना आपल्या आजुबाजुला पाहिल्या आहेत म्हणून किटली देण्याचा विचार मनात आला.
शेतकरी ते ग्रांहक यांचा आर्दश डोळ्या समोर होताच आपल्या मालाची विक्री आपण करायची तसेच शेतकऱ्याला उत्पादन घेता येते विक्री करता येत नाही हा ढबा पुसायचा म्हणून दुध केद्रावर दुध न घालता थेट या उद्देशाने दुध विक्री सुरु केली याला स्थानिक रहिवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
एकी कडे बोनस कमी दिला म्हणून टोल कर्मचाऱ्यांनी फुकट हजारो गाड्या सोडून दिल्याचे लखनऊ एक्स्प्रेस वेवर फतेहाबाद येथे घडले येथे मात्र एका दुध विक्रेत्याने
आपल्या दररोज दुध खरेदी करणाऱ्या ग्रांहकाना किटली दिवाळी भेट दिली ती बुधवारी सकाळी हा तसा त्या ग्राहकांना सु:द धक्का असला तरी यात दुधाच्या साई प्रमाने निखळ माया देखील होती.
गेल्या वर्षा अजीत वरखडे साई नगर येथे सकाळी आपल्या गोठ्यातुन गाईचे ताजे 70 लिटर दुध उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीन्ही रुतु मध्ये विक्री साठी घेऊन येतात अतीशय चांगल्या प्रतीचे दुध असल्याने आजुबाजुचे अबाल वृध्दा सह महिलाची दरोज सकाळी दुध घेण्या साठी लगबग असते हातो हात दुध विक्री होत असली तरी सगळेच दुधा साठी भाडे अणतात असे नाही त्यांना
दुध पॅलस्टीक पिशवीत द्यावे लागते आता दुधाला येताना मी दिलेली किटली घेऊन यायची अशी विनंती अजीत वरखडे यांनी केली तो पर्यंत दुध आणि किटल्या दोन्ही देखील संपल्या होत्या
किटल्याची ही बातमी वारया सारखी पसरली अनेकांनी या भेटीचे कौतुक केले असले तरी देण्या साठी काळीज असावे लागते हे नक्की.
Comments
Post a Comment