शेती साठी आता यात्रिकरण गरजेचे डाॅ तुळशीदास बास्टेवाड

आता शेतीसाठी कृषि यंत्र  गरजेचे 
 प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड

दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुरांचा तुतवडा भासत असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे सध्या जिकिरीचे बनत आहे.  आधुनिक पध्दतीने शेती करणे होय. आधुनिक शेती करत असताना मजुरांचा तुटवडा तसेच त्यांची कमी होत असलेली कार्यक्षमता यावर मात करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशिदास बास्टेवाड यांनी केले.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी आणि कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. बास्टेवाड बोलत होते. यावेळी सांगली जिल्हयातील शेतकर्यांसाठी सुधारीत कृषि अवजारांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जमीनीच्या मशागतीसाठी, आंतरमशागतीसाठी व पीक काढणीसाठी विकसित केलेले विविध अवजारे व यंत्राविषयी तसेच ऊस पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध अवजारांविषयी आणि फळ पिके काढणीसाठी लागणार्या अवजारांविषयी मार्गदर्शन केले. कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलींद देशमुख यांनी सोयाबीन, भुईमूग, हळद, हरभरा व गहू इ. पिकांचे बिजोत्पादनासाठी लागणार्या विविध अवजारांविषयी शेतकर्यांना माहिती दिली. या प्रशिक्षणादम्यान जलसिंचन व निजरा अभियांत्रिकीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीमंत राठोड यांनी कमी निचर्याच्या मध्यम ते भारी काळया पाणथळ जमीनीची निचरा क्षमता वाढविण्यासाठी सबसॉयलर, मोलनांगर, रुंद वरंबा सरी यंत्र आणि खोल मशागतीची अवजारे या विषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मौजे डिग्रज येथील प्रगतशिल शेतकरी श्री. प्रमोद पाटील यांनी ऊस खोडवा पिकामध्ये पाचटाचे व्यवस्थापन करणारी तसेच हिरवळीची खत पिके ताग व धैंचा इ. जमीनीत गाडता येणारी सुलभ अवजारे याविषयी त्यांची यशोगाथा शेतकर्यांसमोर मांडली. 
या प्रशिक्षणामध्ये शेतकर्यांसाठी जमीनीच्या मशागतीसाठी लागणारी विविध अवजारे व यंत्रे, आंतरमगशातीसाठी लागणारी अवजारे व यंत्रे, पिकांवरील किड व रोग नियंत्रणासाठी लागणारी फवारणी यंत्रे तसेच पीक काढणी व मळणीसाठीची विविध अवजारे/यंत्राचे प्रदर्शन मांडण्यात आलेले होते. प्रदर्शनामध्ये मांडलेल्या विविध अवजारांचे शेतीमध्ये प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रशिक्षणादरम्यान शेतकर्यांच्या प्रश्नांचे शंका व समाधान करण्यासाठी कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथील सर्व शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. श्रीमंत राठोड यांनी केले. डॉ. सचिन महाजन यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार