दु:खाचे सावट एका लोकनेत्याच्या अकाली जाण्याने
जत्रेवर दुःखाचे सावट एका
घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
गावाची जत्रा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसतो, तर तो गावाच्या सामाजिक एकात्मतेचा, आनंदाचा आणि परंपरेचा उत्सव असतो. मात्र यंदा देवळाली प्रवरा येथील हीच जत्रा सामूहिक दुःखाची साक्ष ठरत आहे. दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे आजोळ या गावाने आपला लाडका भाचा गमावला गावाचा लाडका ‘दादा’ अकस्मात विमान अपघातात निधन पावल्याने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.
देवळाली प्रवरा हे दादांचे आजोळ. केवळ नात्याने नव्हे, तर भावनेने, जबाबदारीने आणि सामाजिक ऋणानुबंधाने ते या मातीशी जोडलेले होते. बालपणापासूनच त्यांनी गावातील सामान्य माणसांशी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिला यांच्याशी आपुलकीचे नाते जपले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एखाद्या नेत्यापेक्षा घरातील आधारवड हरपल्याची भावना समाजात पसरली आहे.
खंडोबा यात्रेचा उत्सव हा गावाच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू मानला जातो. या यात्रेच्या निमित्ताने गावकरी एकत्र येतात, नाती घट्ट होतात, मतभेद विसरले जातात. मात्र यंदा भव्य खंडोबा महाराज देवस्थान उत्सवावर आनंदाऐवजी शोकाचे सावट आहे.
दादांच्या अकाली जाण्याने समाजात निर्माण झालेली पोकळी केवळ एका कदम कुटुंबापुरती मर्यादित नाही. ती संपूर्ण गावाची, पंचक्रोशीची आणि समाजाच्या विश्वासाची पोकळी आहे. आजही अनेकांना हे वास्तव स्वीकारणे कठीण जात आहे. दादांनी आजोळाशी जपलेले नाते इतके घट्ट होते की, ते आपल्यातून गेले आहेत, हे समाजमन मान्य करायला तयार नाही.
यंदाची जत्रा होत आहे खरी, पण तिच्यातील गजर मंदावलेला आहे. ढोल-ताशांचा आवाज नाही
देवळाली प्रवरा आज केवळ शोक करत नाही, तर एक लोकनेतृत्व हरपल्याची सामूहिक जाणीव मनात साठवून उभी आहे.
Comments
Post a Comment