राहुरी फॅक्टरीवर राज्य मार्गावरील रस्ता रोको आंदोलन अडकले जिल्हाधिकारी

राहुरी फॅक्टरीवर रस्ता रोको आंदोलनात अडकली जिल्हाधिकाऱ्यांची  गाडी.....
आजची बातमी @घाडगे न्यूज 
नगर मनमाड महार्गावर राहुरीत राहुरी फॅक्टरीवर रस्ता रोको आंदोलन बुधवारी करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या मोठ्या रोषाला संबंधित विभागाला समोरे जावे लागले तर नगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे शिर्डी कडे जाणारे वहान जाण्यास देखील मज्जाव झाला मात्र त्यांनी स्थानिक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बोलावून घेत आंदोलनाची  चौकशी केली 
पोलीस निरीक्षकांनी या आदोलना संदर्भात निवेदन रस्ता कृती समितीच्या वतीने देण्यात आले होते संबंधित काम करणारे एजन्सी व आंदोलकांची बैठकीचा तोडगा काढला मात्र आदोलक रस्ता रोको वर ठाम होते 
रस्ता रोको आंदोलनात  संध्या रस्त्यावर दोन्ही बाजुनी बंदिस्त साईड गटार बनविण्याच्या कामाने रस्ता अरुंद होण्याची भिती व्यक्त करण्यात आली तर हा रस्ता नसून मरण मार्ग असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त करत शासनाचा निषेध व्यक्त केला गेल्या दहा वर्षांत या राज्यमार्गावर कोट्यवधी रुपये खर्च झाला असून अनेक निष्पाप प्रवाशांना जिव गमावा लागला आहे शिर्डी व शनिशिगणापुर जागतिक धार्मिक स्थळा वरील हा 54 क्रमाकाचा हा राज्य मार्गा ची दैना कधी हटवणार याचा जाब विचारला तर आता नियोजन बध्द काम कळण्याच्या सुचना करण्यात आल्या यावेळी वसंत कदम,विधिज्ञ प्रशांत मुसमाडे, जयसिंग घाडगे,सुनील विश्वासराव आदींनी मनोगत व्यक्त करुन प्रशासनाला निवेदन दिले अनिल येवले यांनी सुत्र संचालन केले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर