राहुरी शहरात रत्यावर खड्डे की खड्यात रस्ता

राहुरी शहरात रस्त्यावर खड्डे 
की खड्यात गेला रस्ता...
@प्रतिनिधी- श्रेयस लोळगे 
  खराबच्या रस्त्याच्या विरोधात 
  नाथ प्रतिष्ठानचा मोर्चा; खड्यात  अंघोळ करत युवकाने नोदविला प्रशासनाचा निषेध

राहुरी शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था, सतत होणारे अपघात, आणि नागरिकांना होणारा त्रास याच्या विरोधात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने  मोर्चा काढण्यात आला. संस्थापक सौरभ उंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले 
राहुरी नगर परिषदेवर  काढून ढिसास प्रशासनाला जाग यावी म्हणून खडयात आघोळ केली 
यावेळी सौरभ उंडे म्हणाले नवरात्र उत्सवाच्या आधी राहुरी शहरातील खड्डे न बुजवल्यास पुन्हा राहुरी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा त्यांनी प्रशासनाला इशारा दिला., 
यावेळी नाना शिंदे, सचिन बोरुडे,, जानवी उंडे,साक्षी लोळगे, सीमा उंडे नूतन उंडे आदींनी आपलेमनोगत व्यक्त केले.
 पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पाण्याने भरतात, प्रवास करणार्यांना खड्याचा अंदाज न आल्याने आपघातला समोर्य जावे लागते 
 नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागतो. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे 
मोर्चादरम्यान "खड्डे मुक्त राहुरी आमचा हक्क", "एकच नारा – खड्डे मुक्त राहुरी सारा", "प्रशासक हाय हाय", "कर भरतो आम्ही, रस्ता द्या तुम्ही", अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
विशेष म्हणजे, या आंदोलना दरम्यान एका युवकाने खड्ड्यात बसून खड्ड्यातील पाण्याने अंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
मोर्चात सौरभ उंडे, सागर शेटे, ओंकार कासार, नाना शिंदे, सचिन ढवळे, सचिन राऊत, आरिफ शेख, जयंत उंडे, सागर उदावंत, अर्जुन बोराडे, निलेश शिरसाठ, अजिंक्य उदावंत, विलास कदम, प्रसाद भुजाडी, किरण सुराणा, वसीम आतार, सुनील निमसे, प्रल्हाद काशीद, सचिन उंडे, काकासाहेब आढागळे, प्रशांत कोळपकर, सचिन घाडगे,सचिन गुमास्ते, रवी तनपुरे,युवराज तनपुरे , सीमा उंडे, नूतन उंडे, अनिता उंडे, जानवी उंडे, सुनिता शेटे, ताराबाई लोखंडे, इंदुबाई साळवे, प्रमिला कदम, सुनिता नालकर, युगंधरा शेटे, ज्योती लोळगे, सिंधू जंगम, सुनिता बर्डे, अश्विनी दहिवाळकर, प्रियंका जंगम, वैशाली कर्डक, साक्षी लोळगे, लता शेटे, पुष्पा शेटे, स्वाती ढवळे यांचा सहभाग होता.
मोर्चाचे  निवेदन प्रशासनाच्या वतीने विकास घट कांबळे यांनी स्विकारले. 

 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर