ड्रग्ज मध्ये पोलिस सहभागाचा गजर

ड्रग्ज  मध्ये नगरच्या पोलिस
सहभागाचा गजर !

घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे 
            नगर जिल्हा पोलीस दलात ड्रग्जप्रकरणाचा गंभीर गजर वाजला आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेने नगरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन कारवाई केल्याने  खळबळ उडाली असून, ड्रग्जविषयक चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर एमआयडीसीत मोठी कारवाई झाली होती. त्यात देखील कोणी कोणी माती खाल्ली?
आता मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की “करह झाला, कुपणच शेत खायला लागले” असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सामान्य नागरिकासाठी पोलीस म्हणजे आधार. अडचणीत असताना धावून येणारी यंत्रणा. खाकी पाहताच भल्या भल्या गुन्हेगारांची घामछूट होते. मात्र आज त्याच पोलीस यंत्रणेतील काही घटक थेट गुन्हेगारांना साथ देत अवैध धंद्यांचे भागीदार होत असतील, तर हा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा न राहता संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा ठरतो.
पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार मर्यादित असला, तरी त्यांचा रुबाब आणि अधिकार मोठा असतो. मग इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी होण्याचे धाडस एका पोलीस शिपायाला कसे काय मिळते? यामागे विभागातील नेमके ‘आका’ कोण? कोणाच्या छत्रछायेखाली हे सगळे चालते? याचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे.
आज पोलीस, पंटर, दलाल, राजकारणी आणि गुन्हेगार यांची अभद्र युती असल्याची चर्चा उघडपणे होते. राजकारणी भाषणांमध्ये पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त करतात; मात्र स्वतःचा स्वार्थ साधला गेला की परिस्थिती ‘जैसे थे’ होते. कायद्याचा धाक केवळ नावापुरता उरला असून, कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली दिसते.
ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस सहभागाची बाब अतिशय धक्कादायक आहे. नगर जिल्हा मुख्यालयाकडे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांकडे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे ड्रग्ज नेमके कुठे विकले जातात? यातून किती कोटींची माया गोळा होते? आणि या साखळीतील खरे लाभार्थी कोण आहेत? हे प्रश्न आज अनुत्तरित आहेत.
ड्रग्ज म्हणजे काय?
ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ—म्हणजेच ड्रग्ज—म्हणतात. यामध्ये मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, मॅफेड्रॉन (एमडी), ब्राऊन शुगर यांसह भांग, गांजा आणि चरस यांचा समावेश होतो.
नगरमध्ये एमडीचा वाढता विळखा
राज्यात पुण्यानंतर थेट नगर जिल्ह्यात सध्या एमडी (मॅफेड्रॉन) आणि गांजाचे सेवन सर्वाधिक वाढले आहे. चरस व गांजाची जागा आता मॅफेड्रॉनने घेतली आहे. ‘म्याऊम्याऊ’सह विविध सांकेतिक नावांनी ओळखले जाणारे हे ड्रग्ज पांढऱ्या किंवा पिवळसर पावडर अथवा गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध असते.
एमडी हा अँफेटामाइन व कॅथिनोन प्रकारातील स्टिम्युलेटर असून तो मेंदूवरील नियंत्रण प्रणालीवर गंभीर परिणाम करतो. हे औषध नसून मूळतः वनस्पतींसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम रसायन आहे. हाताच्या मनगटावर थोडीशी पावडर ठेवून नाकातून ओढली जाते किंवा थेट इंजेक्शनद्वारे नसेत सोडली जाते. यामुळे तीव्र नशा येते, दात कुडकुडतात आणि शरीरावर गंभीर परिणाम होतात.
हेरॉइन आणि कोकेनपेक्षा एमडीचे व्यसन अधिक तीव्र, सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त आहे. सध्या एक ग्रॅम एमडीची किंमत सुमारे एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत जाते; मात्र या पदार्थांना ठराविक दर नसतो.
प्रश्न अनुत्तरितच
ड्रग्जचे जाळे इतके बळावत असेल आणि त्यातच रक्षकच भक्षक ठरत असतील, तर सामान्य नागरिकाने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? हा प्रश्न आज संपूर्ण नगर जिल्ह्याला भेडसावत आहे.
युवा पिढी वाचवायची असेध तर लाभाचा अथवा केवळ टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा आमली पदार्थ कीड वेळीच रोखली पाहीजे मध्यतरी कोतवाली पोलीस ठाण्यात देखील सेवा निवृतीला आलेलेला एक दादा लाच घेताना रंगेहाथ पकडला होता 
आता ड्रग्ज प्रकरणात पोलीस दादाचा सहभाग आल्याने पोलीसाची आब्रु वेशिला टागली गेली आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर