राहुरी विधान संभेवर भाजपाचे कदम यांचा दावा

उमेदवारी मिळवून देण्याचे अभिवचन मी देतो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा- माजीआमदार चंद्रशेखर कदम
         आपण भारतीय जनता पार्टीशी गेल्या तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ आहोत व पक्षच प्रामाणिक काम करत आहोत, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्यजित ला राहुरी विधानसभेची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणाला नाकारली, तुम्ही सर्व कार्यकर्ते नाराज झाला होता परंतु आपण पक्ष आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपण आपला परतीचा उमदेवार निवडून यावा यासाठी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रामाणिक प्रयत्न केला, तरी देखील आपल्या उमेदवाराचा पराभव झाला, पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार एक पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना असू शकतो, त्याच आधारावर सत्यजित स्वतःसाठी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे, यावेळी त्याची कामाची पद्धती, तरुण उमेदवार, नवीन चेहरा व सुशिक्षित उमेदवार या गुणवत्तेवर पक्ष निश्चित सत्यजित ला उमेदवारी देतील यात मला शंका वाटत नाही म्हणून मी तुम्हाला उमेदवारी मिळवून देण्याचे अभिवचन देतो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असे देवळाली प्रवराच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मा.आ.चंद्रशेखर कदम यांनी प्रतिपादन केले.  
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे, राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदार संघासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदार संघात भेटीगाठी घेऊन विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे, सत्यजित कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारसंघात फिरून आढावा घेतला आहे, भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी सत्यजित कदम यांना मिळावी असा सूर मतदारसंघात आहे त्याबाबत काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा भेटीगाठी घेतल्या आहेत. मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बरोबर मतदारसंघातील गावोगावी शासनाच्या योजनांचे व श्रावण महिना चालू असल्याने धार्मिकस्थळी शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहे. 
            याच पार्श्वभूमीवर निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी व देवळाली प्रवरा गावातील म्हणजे कुटुंबातील कार्यकर्त्यांचा काय निर्णय असेल यासाठी रविवारी १ सप्टेंबरला  अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक धोंडीभाऊ मुसमाडे होते तर उपस्थितांमध्ये भागवत बाबा कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर आबा कदम, गोरख काका मुसमाडे माजी नगरसेवक शिवाजीकाका मुसमाडे, मा.चेअरमन सोपान शेटे, सोपान भांड, बाळासाहेब मुसमाडे, सोपानकाका मुसमाडे, अल्लाउद्दीन शेख , दिपक त्रिभुवन आदींसह नगरपरिषदेचे, सोसायटीचे व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शहरातील असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सत्यजित कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रथम प्रश्न विचारला की, आपण राहुरी विधानसभेची निवडणूक लढवायची का? तरच मला पुढे बोलायला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून सत्यजित कदम यांच्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले, मी पक्षाकडे माझे वडील आमदार होते म्हणून उमेदवारी मागत नाही तर मी पक्ष संघटनेच्या विवध पदावर असतांना व नगराध्यक्ष असताना मी जनतेसाठी प्रामाणिकपणे कामे केली आहेत, या कामांमुळे जर मी पात्र ठरत असेल तर नक्कीच पक्ष मला राहुरीची उमेदवारी देईल व मी तुम्हाला याठिकाणी शब्द देतो की, जसा मी माझ्या कार्यकाळात देवळाली प्रवरा शहराचा सर्वांगीण विकास केला नक्कीच तसे विकासाचे पर्व घडून राहुरी विधानसभा मतदार संघात सर्वांगीण विकास करून संधीचे सोने करेल असे सत्यजित कदम यावेळी म्हणाले, यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपली कामधेनु असलेली राहुरी कारखाना आज बंद अवस्थेत आहे तो चालू करण्यासाठी व उर्जित अवस्थेत आणण्यासाठी आणि आपल्या मतदार संघात विजय मिळविण्यासाठी नेहमीच प्रभावी ठरलेले विकास मंडळाला उभारी देण्याचे काम माझ्या हातून घडेल यावेळी त्यांनी मतदार संघातील रस्ते, पिण्याचे पाणी, पाटपाणी व औद्योगिक विकासासाठी सदैव कटीबद्ध राहील असे यावेळी सत्यजित कदम यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब मुसमाडे, कारभारी खुळे, संदीप खुरुद, रफिकभाई शेख, अनिल येवले, मुकुंद चव्हाण, बाबासाहेब वाळूंज, दिपक त्रिभुवन, शिवाजीकाका मुसमाडे, शहाजी कदम, संभाजी कदम, पोपट खाडे, विजय खळेकर आदींचे भाषणे झाली व मेळाव्याचे प्रास्ताविक मा. उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे आणि सूत्र संचालन व आभार प्रदर्शन  मा.नगरसेवक सचिन ढूस यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार