आदोलन करु

कानेगाव येथे आंबेडकर जयंती साजरी करू देत नाही म्हणून बुद्धिष्ट समाजाने गाव सोडले

आरपीआय आंबेडकर पक्षाकडून निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा

जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कानेगांव येथे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू देत नाहीत म्हणून संपुर्ण बुद्धीष्ट समाजाने गाव सोडल्याची घटना अतिशय वेदनादायक असून  समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केली असून याप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचाचा इशारा दिला आहे.
        जिल्हाध्यक्ष पगारे यांनी म्हंटले की, गेल्या पाच वर्षांपासून कानेगांव या गावात विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू देत नाहीत, विहार उघडू देत नाहीत हा आमच्या स्वाभिमानावर, आमच्या अस्मीतेवर हल्ला आहे.  कानेगावमध्ये जातिवाद चरमसीमेवर पोहचविण्यास कारणीभूत कोण ? त्या गावात इतर महापुरूषांची जयंती साजरी करण्यास निर्बंध नाही तर मग ज्यांनी या देशाचं संविधान लिहिले, ज्यांच्यापुढे अवघं जग नतमस्तक होतं, ज्यांची जयंती 159 देशात साजरी केली जाते त्या महामानवाची जयंती साजरी करण्यास काही चिरगुट अटकाव करतात आणि प्रशासन त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहातं हे कायद्याचं उल्लंघन नाही का ?..... या देशातील लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झाली आहे... एखाद्या गावात आमच्या समाजावर जर अशाप्रकारे अन्याय होत असेल, आमच्या लोकांना गांव सोडावे लागत असेल तर ही घटना हा महाराष्ट्राचाच अपमान नाही तर संपुर्ण देशाला शरमेन मान खाली घालायला लावणारी घटना आहे. आता देशातील सर्वच बुद्धीष्टांनी एकत्रीत येऊन आपल्या समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा लढणे गरजेचे आहे. आमची शुर योद्ध्याची परंपरा आहे हे ही संपुर्ण जगाला माहीत आहे.. आता भारतातील कानेगावातील बौद्धांवर होणाऱ्या अन्यायाची ही घटना बुद्धिष्ट देशातील राजदुतांप्रर्यंत पोहचवून बुद्धभूमीवरच प्रत्यक्ष बौद्ध धर्मियांवर कसा अन्याय केला जातो हे पोहचविणे गरजेचे ठरले आहे.

आमच्या कानेगावच्या समाज बांधवांवर त्यांच्या संविधानिक अधिकारावर केलेल्या या बहिष्काराचा आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रशासनाचा आरपीआय आंबेडकर पक्षाच्यावतीने निषेध करण्यात येऊन राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड,  शहराध्यक्ष हरिश आल्हाट, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, पारनेर तालुका अध्यक्ष किरण सोनवणे, राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, राहुरी तालुका उपाध्यक्ष रमेश पलगडमल,युवक तालुका उपाध्यक्ष प्रतीक खरात यांच्यासह कार्यकर्त्यांवतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.आदोलन

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार