पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला भेट

डॉ. तानाजी नरूटे यांची पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला भेट

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पाडेगाव, ता. फलटण येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरूटे यांनी भेट दिली. यावेळी ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या 16 वाणांची माहिती देवून या वाणाचे देशासाठी आणि राज्यासाठी असलेले योगदान विषद केले. जिल्हा विस्तार केंद्राचेप्रभारी अधिकारी प्रा. गांगुर्डे यांनी विस्तार विषयक कार्यक्रमाची माहिती सादर केली. यावेळी डॉ. तानाजी नरूटे यांनी या केंद्राला देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार तसेच सन 2022 या वर्षीचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊस विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. 
या वेळी संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या प्रयोगांना, ऊस बेणे मळयास तसेच या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन वाणांच्या प्लॉटला त्यांनी भेट दिली. विशेष करून त्यांनी चाबुक काणी व गवताळ वाढ या रोगांचे वेळीच नियोजन करणे किती महत्वाचे असते हे पटवून दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे आणि आभार प्रदर्शन डॉ. किरणकुमार ओंबासे यांनी केले.  याप्रसंगी ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे डॉ. माधवी शेळके डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. रणजितसिंह निंबाळकर,  कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार