नगर जिल्ह्य़ातील सात साखर कारखान्यांवर आर आर सी कारवाई

प्रहार च्या आंदोलनाच्या इशाऱ्याने नगर जिल्हयातील सात साखर कारखान्यांवर RRC (जप्ती) ची  कारवाईस सुरूवात १५ मे रोजी राज्य साखर आयुक्त पुणे कार्यालयात अंतीम सुनावणी...

 दि.११ मे  रोजी अहमदनगर येथील प्रादेशिक संचालक साखर कार्यालयावर होणारे प्रहार चे "टाळे ठोक" आंदोलन पुणे येथील RRC च्या अंतिम निकाला पर्यंत पुढें ढकलले..

दि.१५ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांच्या नेतृत्वात प्रादेशिक संचालक साखर अहमदनगर यांच्या कार्यालयाला "टाळे ठोक" आंदोलन होणार होते परंतु १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील एकूण सात साखर कारखान्यांवर RRC (जप्ती) ची कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांना पाठवून युटेक उर्फ गजानन साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल १० मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे लेखी पत्र प्रादेशिक संचालक व सह संचालक साखर मिलिंद भालेराव व  प्रवीण लोखंडे यांनी आंदोलना पूर्वी दोन दिवस आधी लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती प्रशासनाच्या विनंती  जिल्हाप्रमुख अभिजीत  पोटे व प्रहारच्या सहकाऱ्यांनी एकूण ३३ खाजगी व सहकारी साखर कारखान्यांपैकी थकीत ऊस बिल व पंधरवाडा व्याज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न केल्यास . ११ मे रोजी सर्व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उपस्थितीमध्ये अहमदनगर प्रादेशिक संचालक साखर यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे आंदोलन पत्र दिले होते परंतु प्रहारच्या आंदोलनात च्या ईशारा मुळे  प्रादेशिक कार्यालयाने तातडीने ७ साखर कारखान्यांचा प्रस्ताव राज्य साखर आयुक्त पुणे  शेखर गायकवाड यांना RRC (जप्ती) अहवाल पाठवला होता प्रादेशिक साखर कार्यालय अहमदनगर यांनी प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना संपर्क करून आंदोलनापूर्वी समन्वय चर्चेसाठी येण्याची विनंती केली होती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे , प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे यांच्यासह १० मे रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक संचालक कार्यालय साखर अहमदनगर येथे उपस्थित राहून उपसंचालक  प्रवीण लोखंडे यांच्याशी चर्चा करून ऊस बिल व पंधरवाडा व्याज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने आपण व आपल्या कार्यालयाने संबंधित कारखान्यांवर काय कारवाई केली असे विचारले असता उपसंचालक लोखंडे यांनी राज्य साखर आयुक्त यांच्याकडे कलम ३(८) नुसार आदेश निर्गमित करणे बाबत कळविले आहे RRC (जप्तीचा) पाठपुरावा करून संबंधित ७ साखर कारखाने पैकी युटेक उर्फ गजानन महाराज शुगर संगमनेर, श्री साईकृपा अलाईड हिरडगाव श्रीगोंदा, गणेश कारखाना गणेश नगर राहता, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखाना पिंपळगाव पिसा श्रीगोंदा, अशोक साखर कारखाना अशोक नगर श्रीरामपूर, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे कारखाना शेवगाव, श्री वृद्धेश्वर कारखाना आदिनाथ नगर पाथर्डी या साखर कारखान्यांची RRC (जप्ती) संदर्भात दि. १५ मे रोजी राज्य साखर आयुक्त यांच्या दालनात सुनावणी निकाल होणार असल्याने अहमदनगर प्रादेशिक उपसंचालक साखर   प्रवीण लोखंडे यांनी जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना आंदोलन स्थगित करण्यासाठी लेखी पत्र देऊन संबंधित कारखान्यांवर केलेल्या कारवाई संबंधी होणाऱ्या सुनावणीच्या आदेशाच्या प्रति देऊन सर्व कारखान्यांबाबत दि.३०  एप्रिल २०२३ पर्यंतचा एफ FRP रिपोर्ट देऊन आंदोलन रद्द करण्याची विनंती केली असता जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी दि.१५ मे रोजी राज्य साखर आयुक्त यांच्या दालनात होणाऱ्या सुनावणी निकालाचे रहस्य उलगडून शेतकऱ्यांन पर्यंत येईपर्यंत आंदोलन स्थगित करणार असल्याचे लेखी पत्र देऊन युटेक उर्फ गजानन साखर कारखान्याला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठवलेल्या निवेदना पैकी ९९ टक्के शेतकरी बांधवांचे ऊस बिले मिळाले आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार