वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्हीलचेअर भेट

वाढदिवसानिमित्ताने  व्हिल चेअर भेट 
दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी याच्या वतीने मानुसकिची भिंत या उपक्रमाअंतर्गत राहुरी फॅक्टरी येथील  विजय साळुंके याच्या कडुन व्हीलचेअर देण्यात आली. 
राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोनगाव साञळ येथील प्रहार सैनिक दिव्यांग भगीनी मनीषा चोथे यांना व्हीलचेअर भेट देण्यात आली . 
त्या दोन्ही पायाने दिव्यांग आहेत. त्या रांगत चालत असल्याने त्यांना खूप आवश्यकता होती. व्हीलचेअर चा उपयोग चांगल्या प्रकारे होणार आहे. 
 दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने केलेला उपक्रम पाहुन चोथे कटुंबाने समाधान व्यक्त केले.  विशेष म्हणजे  एकाच चोथे कुटुंबात पाच दिव्यांग आहे.हे सर्व ऐकून  आम्हाला वाईट वाटले यांच्या कुटुंबासाठी संस्थेच्या वतीने त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या निश्चित प्रयत्न करणार आहे असे प्रहार दिव्यांग संघटनेचे  उत्तर अहमदनगर  जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले .  
 तसेच दिव्यांगाच्या साहित्य  उदाहरणार्थ  टॉयलेट खुर्ची. व्हील चेअर कबड्डी.तीन चाकी सायकल. वाकर .चष्मा कानाचा मशीनइत्यादी आपल्याकडे असेल  तर दिव्यांग सेवा संस्थेस देण्यात यावे  ते साहित्य गरजू दिव्यांगांना देण्यात येणार आहे असे आवाहन  संघटनेचे  उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीम शेख यांनी केले यावेळी महिला शहरअध्यक्षा अनामीका हरेल  राहुरी शहर उपअध्यक्ष जालिंदर भोसले 
 अल्ताफ  शेख, स्वप्निल चोथे राधीका चोथे 
 उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार