आरटीओ कार्यालय श्रीरामपूर विरोधात प्रहार ने फोडले फटाके
प्रहार फटाके
श्रीरामपूर आर टी ओ च्या अनागोदी कारभाराविरोधात प्रहारने फोडले
प्रहार कार्यकर्त्यांनी RTO कार्यालयाबाहेर सुतळी बॉम्ब फोडून केला जय प्रहार- अभिजीत पोटे
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे दिवसेंदिवस भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, वाहनांच्या बोगस नोंदी, कागदपत्रांमध्ये फेरफार, वाहन चालक - मालक यांच्याशी अधिकाऱ्यांचे असभ्यपणे वर्तन, एजंटांचा मोक्कार सुळसुळाट, सर्वसामान्य नागरिकांकडून अवाजवी खर्च वसूल करणे, दिव्यांगांसाठी असुविधायुक्त कार्यालय, गाडी नोंदणी व लायसन्ससाठी दिव्यांगांची मोठी अडवणूक अशा एक ना अनेक तक्रारी नागरिकांकडून होत असल्याने (काल)दि. १५ मे २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालुन जाब विचारण्यात आला होता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाललेला अपहार व वाहनांच्या तसेच काही बोगस नोंदी पुराव्यासह समोर ठेवून जाब विचारण्यात आला होता. सदरील नोंदणीची चौकशी होऊनआज पर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे व समक्ष चर्चा करून पक्षाच्यावतीने सुचविण्यात आले होते सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन होणारी परवड, आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे काही नागरिकांचे वाहने विक्री होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडून असून वाहनाचे अनेक पार्टही निकामी झालेले आहे. त्याची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावी तसेच काही वाहनांचे कर थकलेले असूनही त्यांना ना हरकत देण्यात आलेली आहे . त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर या कार्यालयाची खातेनिहाय उच्चस्तरीय चौकशी होऊन भ्रष्ट, बेजबाबदार, अकर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजाची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी याकरिता दिनांक २३ मे २०२३ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सुतळी ॲटम बॉम्ब फोडून अधिकारी व त्यांच्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते
प्रहार जनशक्ती पक्षाचे आधारस्तंभ मा. मंत्री आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदशनाखाली व प्रहार पक्षाची मुलुख मैदानी तोफ अभिजीत पोटे जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांच्या नेतृत्वखाली मंगळवारी २३ मे रोजी आर.टी.ओ. कार्यालय श्रीरामपूर येथे सुतळी ॲटम बॉम्ब आंदोलन करण्यात आले. ज्याप्रमाणे सन १९२९ मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जुलमी राज्यकारभाराविरोधात तसेच बहिऱ्या झालेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेच्या हक्काची व अधिकाराची जाग यावी म्हणून आवाजाचे बॉम्ब फोडून आंदोलन केले होते, अगदी त्याच घटनेची प्रेरणा घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आरटीओ कार्यालय श्रीरामपूर येथील भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या कानात आवाज जाण्यासाठी सुतळी बॉम्ब फोडो आंदोलन करण्यात आले.
आजच्या आंदोलनात दोन वेळा खरेदी विक्री झाल्यानंतर वाहनांचा टॅक्स न भरल्याची आरटीओला उपरती, बोगस एजंटचा सुळसुळाट, सर्वसामान्य नागरिकांची लूट, चालक-मालक यांच्याशी अधिकाऱ्यांचे असभ्यवर्तन, दिव्यांगासाठी असुविधायुक्त कार्यालय, शेकडो वाहन चालकांच्या तक्रारी, कार्यालय परिसरात असणारी अस्वच्छता या आणि अशा अनेक तक्रारीवर, प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने वाचा फोडण्यात आली तसेच उपस्थित अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने अनेक प्रस्न व तक्रारी उपस्थित केल्या प्रहारचे जिल्हाध्यक्ष श्री अभिजीत पोटे यावेळी म्हणाले कि आजचे प्रहारचे आंदोलन कुणा अधिकारी किंवा व्यक्तीविरोधात नाही तर आमचे आंदोलन भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेविरोधात आहे
प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी श्रीरामपूर नेवासा राहता कोपरगाव आधी विविध तालुक्यातून प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांनी प्रहार स्टाईलने सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री डगळे यांना फैलावर घेऊन जोरदार प्रहार केला. दैनंदिन सर्वसामान्य नागरिकांना आरटीओ कार्यालयाकडून होणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला तसेच यापूर्वी निवेदनाद्वारे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विचारणा करण्यात आली. यावेळी डगळे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांकडून काही चुका झाल्याचे मान्य करून सदरील चुका दुरुस्त करून संबंधित नागरिकाला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
दिव्यांगांच्या बाबतीतही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर हे दुतर्फा भूमिका ठेवत असून त्यांच्याशी अगदी बेजबाबदारीने वागले जात आहे. अनेक दिव्यांगांना अद्यापपर्यंत वाहन परवाना नाही तसेच शासननिर्णय असून देखील आरटीओ कार्यालयात दिव्यांगांना वावरण्यासाठी रॅम्प, व्हीलचीअरची व्यवस्था नाही. दिव्यांगांसाठी एक खिडकी योजना नाही. कार्यालयात मुक्तपने संचार करणे दिव्यांगांना शक्य होत नाही जीएसटी व रोड टॅक्स माफीसाठी अनेक चकरा माराव्या लागतात. त्यामुळे नाईलाजास्तव एजंटला भरीव रक्कम देऊन त्याच्यामार्फत काम करावे लागते, हि एक प्रकारची अडवणूक असून येत्या एक वर्षाच्या आत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे दिव्यांगांना वावरण्यासाठी रॅम्प, व्हीलचीअरची व्यवस्था, एक खिडकी योजना आदी शासननिर्णयाप्रमाणे व्यवस्था न झाल्यास अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाईल असे ठणकावले.
यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डगळे यांनी लेखी पत्र देऊन सर्व मागण्या मंजूर करून लवकरात लवकर कार्यान्वित करून मागण्या मंजूर करतात प्रहार कार्यकर्त्यांनी कार्यालय समोरच सुतळी बॉम्ब फोडून जल्लोष केला जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, उपाध्यक्ष लक्ष्मणराव खडके, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार वाहतूक सेल प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, श्रीरामपूर विधानसभा कामगार सेल प्रमुख बाळासाहेब कराळे, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, श्रीरामपूर तालुका युवक अध्यक्ष रघुनाथ शिंदे, राहता तालुका युवक अध्यक्ष विजय काकडे, तालुका कार्याध्यक्ष नाना तागड, तालुका संघटक रमेश भालके, तालुका युवक कार्याध्यक्ष भैरवनाथ कांगुने, गणेश भालके, भेंडा प्रहार शाखा संपर्कप्रमुख संदीप पाखरे, शाखाध्यक्ष मोतीराम शिंदे, पप्पू नाकाडे, बंडू आरगडे, आधार दिव्यांग संघटना संपर्क प्रमुख राम डमाळे, जिल्हा प्रभारी विष्णू पाठक, तालुका प्रभारी भारत चौधरी, सुमित राहिले, सोमनाथ गर्जे, नवनाथ पुंड, देविदास मनाळ, भिकाजी जाधव, असिफ शेख आदीसह आरटीओ परिसरातील उपस्थित असणारे शेकडो नागरिक व प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment