खरीप हंगाम बैठक पुण्यात

खरीप हंगाम विभागीय बैठक पुण्यात
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कामधेनु सभागृह, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे दिनांक 20 जून, 2023 रोजी विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप-2023 च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील भूषविणार आहेे. प्रमुख पाहुणे म्हणून कृषि आयुक्त  सुनिल चव्हाण, प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे उपस्थित असणार आहेत. ही बैठक संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या बैठकीमध्ये गतवर्षाचा पीक उत्पादनाचा आढावा आणि खरीप 2023 चे नियोजन बाबत सखोल चर्चा होणार आहे. खरीप हंगामासाठी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान आणि शिफारशींचे सादरीकरण होऊन कृषि विभागास हे तंत्रज्ञान आणि शिफारशी पुढील विस्तारासाठी देण्यात येणार आहेत. सदर बैठकीत खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजनासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या बैठकीला कृषि विभागाचे सर्व संचालक, कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी,  विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार