विठ्ठुरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

@ पत्रकार शिवाजी घाडगे 
पढरपुरात आषाढी वारी यात्रे निमित्त आता दिड्या असुन विठ्ठल मंदिरावर आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे लाखो भाविक मोठ्या श्रध्देने विठू दर्शना साठी येतात वारी मध्ये वारकऱ्यांमध्ये तर मोठा उत्साह असतो 
चंद्रभागा नदी मध्ये स्नान करून भाविक कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानतात तर काही जण दर्शन रांगेत तासनतास उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेतात शासकीय अभिषेक केला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पुजा पाठ करणार आहेत 
 लाखो भाविक पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शना साठी येत असताता कोणी पाई वारी मध्ये तर कोणी आपल्या वाहनातून एस टी देखील 
पंढरपूर यात्रा स्पेशल बस ची व्यावस्था करत असते 
  $ "नगर विभाग यांचे मार्फत
आषाढी पंढरपूर यात्रा स्पेशल - २०२३ करिता दिनांक २५ जून ते ३ जुलै २०२३ करिता ज्यादा बसेस सोडण्यात आल्या असून त्याकरिता आकारण्यात येणारे भाडे खालील प्रमाणे.
  १) अहमदनगर तारकपूर ते पंढरपूर*
फुल तिकीट २९०/- हाप तिकीट १४५/-
शिवशाही व शयनयान बस करिता
फुल तिकीट ४१०/- हाप तिकीट २०५/-
आगार व्यवस्थापक - अभिजीत आघाव
२) संगमनेर ते पंढरपूर
फुल तिकीट ४४५/- हाप तिकीट २२५/-
३) श्रीरामपूर ते पंढरपूर
फुल तिकीट ४००/- हाप तिकीट २००/-
आगार व्यवस्थापक - महेश कासार
४) कोपरगाव ते पंढरपूर
फुल तिकीट ४४५/- हाप तिकीट २२५/-
आगार व्यवस्थापक - अमोल बनकर
५) पारनेर ते पंढरपूर
फुल तिकीट ३५०/- हाप तिकीट १७५/-
आगार व्यवस्थापक - अमोल कोतकर
६) नेवासा ते पंढरपूर
फुल तिकीट ३८५/- हाप तिकीट १९०/-
७) अकोले ते पंढरपूर
फुल तिकीट ४८०/- हाप तिकीट २४०/-
८) शिर्डी ते पंढरपूर
फुल तिकीट ४२५/- हाप तिकीट २१५/-
९) माही जळगाव ते पंढरपूर
फुल तिकीट २००/- हाप तिकीट १००/-
१०) शेवगाव ते पंढरपूर
फुल तिकीट ३६५/- हाप तिकीट १८५/-
११) जामखेड ते पंढरपूर*
फुल तिकीट २२०/- हाप तिकीट ११०/-
१२) पाथर्डी ते पंढरपूर
फुल तिकीट ३३०/- हाप तिकीट १६५/-
आगार व्यवस्थापक - अरिफ पटेल
१३) कर्जत ते पंढरपूर
फुल तिकीट १९०/- हाप तिकीट ९५/-
१४) श्रीगोंदा ते पंढरपूर
फुल तिकीट २५५/- हाप तिकीट १२५/-
१५) राजुर ते पंढरपूर
फुल तिकीट ५२५/- हाप तिकीट २६०/-
१६) कोतुळ ते पंढरपूर
फुल तिकीट ४८०/- हाप तिकीट २४०/-
१७) ब्राह्मणी ते पंढरपूर
फुल तिकीट ३७५/- हाप तिकीट १९०/-
१८) सोनई ते पंढरपूर
फुल तिकीट ३६५/- हाप तिकीट १८५/-
१९) कुकाणा ते पंढरपूर
फुल तिकीट ३८५/- हाप तिकीट १९०/-
२०) वांबोरी ते पंढरपूर
फुल तिकीट ३४०/- हाप तिकीट १७०/-
 सर्व महिलांकरिता ५० टक्के सवलत तसेच ७५ वर्षावरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत शंभर टक्के सवलत.
    #नगर जिल्ह्य़ातुन 26 पायी दिड्या  पंढरपूर गेल्या आहेत त्यात निळोबा रायाची मानाची दिडी आहे तसेच ताहाराबाद महिपती बुवा दिंडी 
महंत भास्करगिरी देवगड दत्त देवस्थान शिस्त प्रिय दिंडी मानली जायची 
देवळाली प्रवरा येथुन माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील समर्थ बाबुराव पाटील पायी दिंडी काढतात त्याचे हे 12 वर्ष आहे 
    #जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण
वारी आपल्या दारी संपर्क सूचीमुळे वारकऱ्याला मिळाली वेळेत आरोग्यसेवा
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या "वारी आपल्या दारी" या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
शनिवार 24 जून रोजी  अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री  अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी  हृदयविकाराचा अटॅक आला.  पवार यांच्यासोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी "वारी आपल्या दारी" या संपर्क सुचीमधून मोबाईल क्रमांक पहात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून घटनेची माहिती देत मदत मागितली. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन क्षणाचाही विलंब न करता सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना रात्री २.४६ वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली व वारकरी पवार यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची सूचना केली. सोलापूर प्रशासनाने तत्परता दाखवत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वारकऱ्याला वैद्यकीय सेवा दिली. तत्परतेने व वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्याने  पवार यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार